आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 33 Highlights राजेश सुशांतला घरातील सर्व कामे करण्याची मिळाली शिक्षा, ऋतुजा झाली जखमी

#BBmarathiDay33 : राजेश-सुशांतला घरातील सर्व कामे करण्याची मिळाली शिक्षा, ऋतुजा झाली जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनसीचा टास्क रंगला. ज्याप्रमाणे फुले कुठलाही भेद न बाळगता सर्वांना एक सारखा सुगंध देतात, अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टनने सर्वांना एक समान न्याय देणे, आनंद देणे अपेक्षित आहे. म्हणूनच सदस्यांमधील वेगवेगळ्या रंगाची पारख करण्यासाठी बिग बॉस सदस्यांना “रंग माझा वेगळा” हे कॅप्टनसीचे कार्य दिले होते.  कॅप्टनसीसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांनी आपली छानशी फुलांची बाग तयार करायची होती. बागेमध्ये स्वत:ची फुले रोवून बाग सजवायची होती. त्या उमेदवाराचे समर्थक त्यांच्यासोबतच उभे असणार होते. तर बाकीच्या सदस्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराच्या रंगीत फुलांची बाग जपायची होती. पुष्कर आणि सुशांत हे दोघेही कॅप्टनसीसाठी या आठवड्यामधील उमेदवार होते. यामध्ये सुशांतच्या बाजुने जुई गडकरी, राजेश श्रृंगारपुरे, स्मिता गोंदकर, रेशम टिपनीस, भूषण कडू, हर्षदा खानविलकर होते. तर पुष्करच्या बाजुने आस्ताद काळे, मेघा धाडे आणि ऋतुजा होते. तर उषा नाडकर्णी संचालकाच्या भूमिकेत होत्या. सुशांतच्या टीमने पुष्करची सगळी बाग उद्धवस्त केली. तर सुशांतची बाग शाबूत राहिली. पण या टास्कदरम्यान ऋतुजाच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यापूर्वी एका टास्कदरम्यान सईच्या कंबरेला जबर मार लागला होता. त्यामुळे बिग बॉसने सईप्रमाणेच ऋतुजालासुद्धा विश्रांती घेण्यास सांगितले. 

 

टास्कदरम्यान राजेश-सुशांतने केला हिंसेचा वापर, ठरले शिक्षेस पात्र 
या टास्क दरम्यान राजेश आणि सुशांत यांनी शक्तीचा वापर केला. खऱं तर बिग बॉसच्या घरात हिंसा करण्यावर सक्त मनाई आहे. पण बिग बॉसने वारंवार सूचना देऊनही दोघांकडून या नियमाचे उल्लंघन झाले. हिंसेचा वापर केल्याने बिग बॉस राजेश आणि सुशांत या दोघांनाही कठोर आणि कडक शब्दांमध्ये त्याची जाणीव करून दिली आणि सोबतच दोघांनाही शिक्षेस पात्र ठरवले. बिग बॉसने या दोघांनाही घरातील स्वयंपाकापासून ते धुणी-भांडी, घराची स्वच्छता राखणे, अशी सगळी कामे करण्याची शिक्षा सुनावली. या दोघांना कोणीही मदत करु शकणार नसल्याचे बिग बॉसने घोषित केले. 

 

सईच्या रागाचा झाला स्फोट...
कुठल्याही टास्कदरम्यान कायम हिंसेचा वापर करण्यात येत असल्याने सईचा राग अनावर झाला. हिंसेचा वापर केल्यानेच कंबरेला जबर मार बसल्याची ती म्हणाली. यावेळी आस्ताद, पुष्कर आणि मेघा यांनी सईचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. राजेश आणि सुशांत यांना बिग बॉसने दिलेली शिक्षा योग्यच असल्याचे मत सईसह आस्ताद, पुष्कर आणि मेघा यांनी व्यक्त केले. 

 

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कुणीच नाही कॅप्टन... 
या आठवड्यात सुशांत आणि पुष्कर हे दोघे कॅप्टनसीपदाचे उमेदवार होते. दिलेल्या टास्कमध्ये सुशांत विजयी ठरला होता. पण टास्कदरम्यान हिंसेचा वापर करण्यात आल्याने बिग बॉसने या आठवड्यात घरात कुणीही कॅप्टन नसल्याचे जाहिर केले. त्यानुसार, स्मिताचा कॅप्टनपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता आठवडाभर घरात कुणीही कॅप्टन नसणार. 
 

रंग माझा वेगळानंतर घरात रंगली प्रश्नमंजुषा....
रंग माझा वेगळा या टास्कनंतर बिग बॉसने घरातील स्पर्धकांना प्रश्नमंजुषा खेळायचा टास्क दिला. या टास्कच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी हर्षदा खानविलकरवर सोपवण्यात आली होती. यासाठी टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम करण्यात आल्या. टीम एमध्ये आस्ताद काळे, उषा नाडकर्णी, सई लोकूर, मेघा धाडे, पुष्कर जोग होते. तर टीम बीमध्ये सुशांत शेलार, जुई गडकरी, राजेश श्रृंगारपुरे, स्मिता गोंदकर, रेशम टिपनीस, भूषण कडू हे स्पर्धक होते. या प्रश्नमंजुषाने जास्तीत जास्त प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन टीम बी विजयी ठरली. त्यांना गिफ्ट्स हॅम्पर देण्यात आले.  

 

हर्षदावर वैतागला राजेश...
बिंब प्रतिबिंब या टास्करदरम्यान हर्षदाने राजेश आणि रेशम यांची कानउघाडणी केली होती.  राजेश आणि रेशम यांच्या नात्याबद्दल प्रेक्षकांमध्ये आणि समाजात काय बोलले जाते हे सांगत हर्षदाने या दोघांची शाळाच घेतली होती.  हर्षदा आणि रेशम या दोघी वीस वर्षे जुन्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे रेशमने हर्षदाचा सल्ला म्हणून तिने सांगितलेल्या गोष्टी सकारात्मकपणे घेतल्या, पण राजेश मात्र हर्षदावर प्रचंड वैतागला. हर्षदाला राजेशने काही उलट बोलू नये, यासाठी रेशमने त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. परंतु, रेशमचे बोलणे फारसे मनावर घेताना राजेश काही दिसला नाही. उलट, 'माझ्यासमोर बोलण्याची हर्षदाची लायकी नाही. पुन्हा जर ती असे काही बोलली तर मी तिला सुनावताना विचार करणार नाही' असे राजेशने रेशमला उत्तर दिले. 


पुढील स्लाईड्सवर बघा, बिग बॉस मराठीच्या 33 व्या दिवसाची झलक छायाचित्रांमध्ये...

 

बातम्या आणखी आहेत...