आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 34 Highlights #BBMarathi : आज रेशम मेघावर करणार पलटवार, घरामध्ये भरणार आहे ग्राम सभा!

#BBMarathi : आज रेशम आणि मेघामध्ये होणार खडाजंगी, घरामध्ये भरणार ग्रामसभा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल राजेश शृंगारपुरे घराबाहेर पडला. त्याचे बाहेर जाण्याचे दु:ख काही सदस्यांना झाले, त्यांनी ते व्यक्त देखील केले. आता नवा आठवडा सुरु झाला आहे, त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रियेला आज सुरुवात होणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया जरा वेगळी असणार आहे. कारण घरामध्ये भरणार आहे ग्रामसभा. ज्यामध्ये मेघाचे म्हणणे ठरले की, बहुमताने जर नॉमिनेशन ठरवले तर आऊ, मी, सई आणि पुष्कर आम्ही सगळेच नॉमिनेशनमध्ये येऊ. 


अशी रंगणार ग्राम सभा...  
गावांमधील कारभार ग्रामपंचायत ही स्थानिक संस्था बघते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशनसाठी अशीच एक ग्राम सभा भरणार आहे. ही एक प्रकारची पंचायत असेल. ग्रामपंचायतीचे महत्वाचे निर्णय जसे ग्रामसभेमध्ये पार पडतात, त्याचप्रमाणे इथे दात फिरीयातचे नॉमिनेशन कार्य होणार आहे. या आठवड्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया ग्रामपंचायतिच्या माध्यमातून पार पडणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रामीण पद्धतीने झाडाखाली पंचायत रंगणार आहे. यानिमित्ताने घरामधील सदस्यांच्या जोड्या करण्यात येतील. या दोन्ही सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का रहावे तसेच दुसरा सदस्य घरामध्ये राहण्यास कसा अयोग्य आहे, हे पंचायतीमधील इतर सदस्यांना पटवून द्यायचे आहे. जेव्हा जोडी स्वत:ची कारणे देत असतील तेव्हा इतर सदस्य पंच म्हणून भूमिका पार पाडतील. जोड्यांची कारणे ऐकल्यानंतर सर्व सदस्यांनी कोणा एकाला नॉमिनेट तर दुसऱ्याला सुरक्षित करायचे आहे. 

 

रेशम-मेघामध्ये होणार खडाजंगी...

या टास्कमध्ये सई आणि स्मिता, रेशम आणि मेघा, जुई आणि उषा ताई, भूषण आणि आस्ताद, सुशांत आणि पुष्कर अशा जोड्या असणार आहेत आणि या जोड्या त्यांची मते सदस्यांना सांगणार आहेत. ज्यामध्ये रेशम आणि मेघामध्ये बराच वाद देखील होणार आहे. रेशमने मेघाला जाब विचारला की, “तुम्ही तुमच्या घरामधील लोकांवर चिखल फेक करता... हा अधिकार तुम्हाला कोणी देला ?.” तेव्हा आज घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करतील हे बघणे रंजक असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...