आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 36 Highlights रडूनरडून बेहाल झालेल्या रेशमने हर्षदावर व्यक्त केला राग, मेघावर केली आगपाखड

#BBMarathi: रडूनरडून बेहाल झालेल्या रेशमने हर्षदावर व्यक्त केला राग, मेघावर केली आगपाखड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस मराठी'मधून रविवारी राजेश श्रृंगारपुरे घराबाहेर पडला. रेशमसोबतचे प्रेमाचे जाहिर प्रदर्शन राजेशला चांगलेच महागात पडले. राजेश बाहेर पडल्यानंतर घरात सोमवारच्या भागात रेशम मात्र रडूनरडून चांगलीच बेहाल झालेली दिसली. खूप रडल्याने तिचे डोळे सुजले होते. विशेष म्हणजे यावेळी चक्क मेघा रेशमला आधार देताना दिसली.

 

हर्षदा खानविलकरविषयी रेशमने व्यक्त केला राग...

विकेंडचा डावमध्ये रेशम आणि राजेश यांच्यावर महेश मांजरेकरांसोबत घरातील अनेक सदस्यांनी रोष व्यक्त केला. राजेश-रेशम यांच्यामुळे बिग बॉसचा शो अॅडल्ट शो झाल्याची टीका अनेक सदस्यांनी केली. त्यामुळे घरातील सदस्यांचे हे शब्द रेशमच्या चांगलेच जिव्हारी लागले. जेव्हा आस्तादने अबोला धरलेल्या रेशमसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने हर्षदा खानविलकरविषयी खूप राग मनात असल्याचे आस्तादकडे बोलून दाखवले. शिवाय सुशांत, भूषण आणि आस्तादव्यतिरिक्त घरातील इतर कुठल्याही सदस्याशी तिळमात्र बोलण्याची इच्छा होत नसल्याचे रेशम यावेळी म्हणाली. योग्य वेळ आल्यानंतर मनातील राग व्यक्त करणार असल्याचेही रेशमने यावेळी आस्तादशी बोलताना म्हटले. 

 

घरात रंगली नॉमिनेशन प्रक्रिया...

गावांमधील कारभार ग्रामपंचायत ही स्थानिक संस्था बघते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशनसाठी अशीच एक ग्राम सभा भरली. ही एक प्रकारची पंचायत होती. ग्रामपंचायतीचे महत्वाचे निर्णय जसे ग्रामसभेमध्ये पार पडतात, त्याचप्रमाणे येथे दात फिरीयातचे नॉमिनेशन कार्य होणार आहे. या आठवड्यामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पडत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रामीण पद्धतीने झाडाखाली पंचायत रंगली. यानिमित्ताने घरामधील सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या. या दोन्ही सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का रहावे तसेच दुसरा सदस्य घरामध्ये राहण्यास कसा अयोग्य आहे, हे पंचायतीमधील इतर सदस्यांना पटवून द्यायचे होते. जेव्हा जोडी स्वत:ची कारणे देत असतील तेव्हा इतर सदस्य पंच म्हणून भूमिका पार पाडतील, असे बिग बॉसच्या वतीने सांगण्यात आले होते.

 

हे सदस्य झाले नॉमिनेट...

भूषण-आस्ताद, जुई-उषा नाडकर्णी, सई-स्मिता, मेघा-रेशम, पुष्कर-सुशांत अशा जोड्या बिग बॉसने केल्या होत्या. यापैकी पंचायतने भूषण, जुई, स्मिता, पुष्कर यांना सुरक्षित केले, तर आस्ताद, उषा नाडकर्णी, सई आणि सुशांत हे नॉमिनेट झाले. 

 

मेघावर केली रेशमने आगपाखड...

सोमवारच्या भागात शेवटची जोडी म्हणून मेघा आणि रेशम यांच्यात पंचायतीसमोर स्वतःला का सुरक्षित करावे आणि दुस-या सदस्याला का नॉमिनेट करावे, हा टास्क रंगला. यावेळी मेघाने रेशमचे घरात वागणे किती चुकीचे होते आणि मी पहिल्या दिवसापासून कसा खेळ खेळतेय, घरातील सगळी कामं कशी करतेय, हे पंचाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मेघाचे बोलणे झाल्यावर रेशम मात्र चांगलीच वैतागलेली दिसली.  रेशमने मेघाला जाब विचारला की, “तुम्ही तुमच्या घरामधील लोकांवर चिखल फेक करता... हा अधिकार तुम्हाला कोणी देला ?.... तू सुद्धा एका आठवड्यात बॅग पॅक कर आणि आठवडाभर कसे प्रेशरमध्ये राहावे लागते, हा अनुभव एकदा घेऊन बघ,” असेही रेशम मेघाला म्हणाली. आता मेघा आणि रेशम यांच्यापैकी पंचायत कुणाला सुरक्षित करणार आणि कुणाला नॉमिनेट करणार हे आजच्या भागात बघणे रंजक ठरणार आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघुयात, सोमवारच्या भागाची क्षणचित्रे... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...