आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 37 Murder Mistry Task Highlights #BBMDay37: आस्ताद मेघाने केले घरात पाच खून, खुनी कोण गुप्तहेरांना शोध लागेना!

#BBMDay37: आस्ताद-मेघाने केले घरात पाच खून, खुनी कोण गुप्तहेरांना शोध लागेना!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल मर्डर मिस्ट्री हा टास्क रंगला.  या प्रकारचा टास्क या घरामध्ये पहिल्यांदाच खेळला गेला. या टास्कमध्ये आस्ताद काळे खुनी तर स्मिता आणि सुशांत गुप्तहेर आहेत तर बाकीचे घरातील सदस्य सामान्य नागरिक झाले. विशेष म्हणजे आस्ताद कमी वेळेतच पुष्करचा सांकेतिक खून करण्यात  यशस्वी झाला. त्याने पुष्करचा फोटो लपवला. नंतर त्याने हर्षदा खानविलकर, मेघा धाडे आणि जुई गडकरी यांना स्वतःची ट्रॅजिक लव्हस्टोरी सांगून रडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश मिळाले नाही. पण नंतर खाण्यात जास्त मीठ टाकून त्याने रेशम टिपनीसचा सांकेतिक खून केला. अशाप्रकारे घरात एकमागून एक दोन खून झाले. 


बिग बॉसने मेघाला दिले बर्थडे गिफ्ट...
काल घरात मेघाचा वाढदिवस साजरा झाला. मेघाच्या घरुन तिच्यासाठी बर्थडे केक पाठवण्यात आला होता. गार्डन एरियामध्ये सगळे स्पर्धक एकत्र आले आणि त्यांनी मेघाचे बर्थडे सेलिब्रेशन केले. मेघाच्या बर्थडेच्या निमित्ताने बिग बॉसने तिला एक गिफ्ट दिले. मेघाने बिग बॉसकडे खूनी व्हायची इच्छा व्यक्त केली होती. बिग बॉसने तिची ही इच्छापुर्ती केली आणि मेघाने आस्तादसोबत मिळून सांकेतिक खून करायला सुरुवात केली. मेघाने सर्वप्रथम सांकेतिक खून केला तो भूषण कडूचा. बिग बॉसने या दोघांना सामान्य नागरिकाच्या अंगावर पाणी टाकून सांकेतिक खून करण्याचा आदेश दिला होता. मेघाने अतिशय सफाईदारपणे भूषणच्या अंगावर पाणी टाकून त्याचा खून केला. त्यानंतर जुईचा फॅमिली फोटो लपवून तिचाही खून करण्यात मेघा यशस्वी झाली. इतकेच नाही तर तिने हर्षदा खानविलकरला घास भरवून तिचाही खून केला. अशाप्रकारे घरात एकामागून एक पाच सांकेतिक खून करण्यात आस्ताद आणि मेघा यशस्वी झाले. 


गुप्तहेरांना सुगावा काही लागेना... 
स्मिता  आणि सुशांत गुप्तहेराची भूमिका बजावत असून दोघांचा मेघा आणि आस्तादवर संशय आहे. आजच्या भागात स्मिता आणि सुशांत यांना खुनी कोण हे सांगायचे आहे. त्यासाठी गार्डन एरियामध्ये कोर्ट रुम उभारण्यात आली आहे. या टास्कचा थेट परिणाम कॅप्टनसीवर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता घरातील सदस्य नव्हे तर वाइल्ड कार्ड एन्ट्री आज घरात प्रवेश करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत अनिश्चित काळासाठी घराची कॅप्टन राहणार असल्याचे बिग बॉस घरातील इतर सदस्यांना सांगणार आहे. त्यामुळे आता स्मिता-सुशांत खरंच खुनी कोण हे ओळखू शकणार का? शर्मिष्ठा राऊतच्या  एन्ट्री कुणाला होणार आनंद आणि कोण होणार दुःखी हे आजच्या भागात बघणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, 37 व्या दिवसाची खास झलक छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...