आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 39 Harshada Khanvilkar Exit या कारणामुळे झाली हर्षदाची घरातून एक्झिट, सदस्य झाले इमोशनल

#BBMDay39 :या कारणामुळे झाली हर्षदाची घरातून एक्झिट, सदस्य झाले इमोशनल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्याच सदस्यांना एक धक्का मिळाला. बिग बॉसने घरातील सदस्यांना 'अतिथि देवो भव'चा अर्थ समजावून सांगितला. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना कधीना कधी निरोप द्यावा लागतो. त्यामुळे घरात आलेल्या अतिथीला आता निरोप द्यायची वेळ आली असल्याचे बिग बॉसने म्हटले. हर्षदा खानविलकर   या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून नाही, तर एका आठवड्यासाठी पाहुणी म्हणून आली होती आणि आता तिला निरोप द्यायची वेळ आल्याचे बिग बॉसने सांगितले. हे ऐकून घरातील सर्वच सदस्य शॉक झाले. 


घरात आले तेव्हा जाताना रडेल, असे वाटले नव्हते पण आता तुमचा निरोप घेताना मला अश्रू अनावर झाले आहेत, असे हर्षदा खानविलकर म्हणाली. तर  जुई, रेशम आणि सुशांतदेखील यावेळी भावूक झालेले दिसले. 


हर्षदा खानविलकरने प्रत्येक सदस्याला एक संदेश दिला. “रेशम जिंकावी हीच माझी इच्छा असेल आणि मी तिला तशा शुभेच्छा देते” असे तिने जाता जाता सांगितले आणि बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. 


हर्षदा खानिवलकर आणि इतर सदस्य यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते, बघुयात हर्षदाला निरोप देतानाची घरातील सदस्यांची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...