आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay39: सदस्यांना मिळाले सरप्राइज आणि धक्का, शर्मिष्ठा राऊतची झाली घरात एंट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'मर्डर मिस्ट्री' या टास्कमध्ये आरोपीच्या भूमिकेत असलेले आस्ताद आणि मेघा या टास्कचे विजते ठरले. हे दोघेही  पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले.  तर गुप्तहेरांच्या भूमिकेत असलेले स्मिता आणि सुशांत आरोपींनी हे खून कसे केले, याचा उलगडा योग्यरित्या लावू शकले नाहीत. गुप्तहेर त्यांच्यावरील   आरोप सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावेळेस बिग बॉस यांनी स्मिता आणि सुशांत यांनी खून कसे झाले याचे दिलेले स्पष्टीकरण वाखाण्याजोगे होते. परंतु पुराव्यांच्या अभावी ते सिद्ध होऊ शकले नाही असे देखील सांगितले.  या टास्कदरम्यान घरातील सदस्यांमध्ये तंटे उडाले नाहीत, हे विशेष.

 

कालच्या भागात हर्षदा खानविलकरची एक्झिट घरच्यांसाठी मोठा धक्का ठरली. पण त्यानंतर एक सरप्राइजदेखील घरच्यांना मिळाले.  काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण ? याचे कोडे उलघडले. 


SR म्हणजेच शर्मिष्ठा राऊत... 
बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. शर्मिष्ठा राऊत ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आस्ताद काळे, भूषण कडू, आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांना शर्मिष्ठा पुर्वीपासून ओळखते. 

 

अनिश्चित काळासाठी झाली कॅप्टन...
शर्मिष्ठा घरात अनिश्चित काळासाठी कॅप्टन राहणार असल्याचे बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना सांगितले. घरातील सदस्यांनीदेखील आनंदाचे तिचे स्वागत केले आणि कॅप्टन रुमचा ताबा दिला. 


घरात आल्यानंतर सई-मेघाशी झाली मैत्री..  
घरामध्ये आल्यानंतर शर्मिष्ठाने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. तिला आऊ, मेघा आणि सई ज्याप्रकारे खेळत आहेत ते खूपच आवडते आणि बाहेर देखील हे चांगल्याप्रकारे दाखवले जात आहे असे त्यांना सांगितले. तसेच मेघा आणि सईला संदेश आणि गिफ्ट देखील दिले. ही मैत्री आता पुढे किती टिकणार ? कोण कोणाची साथ देणार ? हे बिग बॉसच्या घरात बघणे उत्कंठावर्धक राहणार आहे. 


पाहुयात, बिग बॉस मराठीच्या घरातील शर्मिष्ठाची निवडक छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...