आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 40 Highlights धमकी कुणाला देतोस... म्हणत सई घेणार सुशांतची पंगा, आज होणार राडा

#BBMDay40 : धमकी कुणाला देतोस... म्हणत सई घेणार सुशांतशी पंगा, आज होणार राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना एक धक्का तर एक सरप्राइज मिळाले. हर्षदा खानविलकर स्पर्धक नव्हे तर पाहुणी कलाकार म्हणून घरात आल्याचे काल सर्व सदस्यांना कळले आणि तिची घरातून एक्झिट झाली. तर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिची घरात स्पर्धक म्हणून वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली. आता आजच्या     भागात घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडणार आहेत.


हा असेल टास्क... 
बिग बॉस “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचे कार्य घरतील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे. यामध्ये घरातील सदस्यच या उमेदवारांच्या समर्थनाचे कार्य करणार आहेत. टीम मेघा आणि टीम सुशांत अशा दोन टीम असणार आहेत. उमेदवारांनी चौकटीच्या ठोकळ्यावर कोणताही आधार न घेता उभे रहायचे आहे. हे दोन्ही उमेदवार त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थक करणार आहेत. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या समर्थकांपासून आपआपल्या उमेदवाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न त्या उमेदवाराचे समर्थक करणार आहेत. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे आहे आणि हाच समर्थकांचा उद्देश असणार आहे.


सई आणि सुशांतमध्ये होणार वाद...
या टास्कदरम्यान सुशांत आणि सई लोकूर यांच्यात वाद झाल्याचे प्रेक्षकांना आज बघायला मिळणार आहे. सुशांतच्या खासगी गोष्टींचा उल्लेख करुन सई त्याला त्रास देताना दिसेल. त्यावरुन सुशांत तिच्यावर चिडताना दिसणार आहे. या दोघांमधील वाद आजच्या भागाचा हायव्होलेटज ड्रामा ठरणार, हे काही वेगळे सांगायला नको. 


पाहुयात, आजच्या भागाची क्षणचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...