आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi : घरामध्ये आज रंगणार 'अंडे का फंडा' टास्क, कोण बनणार कॅप्टन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये बिग बॉस मराठीचे घर बनले पाळणा घर. यामध्ये असलेल्या बाहुलीभोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगली. या बाबा गाडीमधील बाहुलीवर घरातील इतर सदस्यांचा फोटो लावण्यात आला होता. म्हणजेच प्रत्येक सदस्य दुसऱ्या एका सदस्याचे प्रतिनिधित्व करणार होते. म्हणजेच नॉमिनेशन प्रक्रिया ही घरातील इतर सदस्यांवरच अवलंबून होती. या आठवड्यामध्ये घरातून घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जुई, सई, सुशांत, रेशम, आस्ताद आणि पुष्कर नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे अजून एक कार्य. खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्य असणार कॅप्टनसीचे उमेदवार. ही कॅप्टनसीची दावेदारी सदस्यांच्या पुढील प्रवासावर पडणार का भारी ? हे येणारा काळच ठरवेल. कॅप्टनसीमुळे मिळणारी इम्युनिटी पुढे जाण्यासाठी खूप महत्वाची असते. या कार्यामध्ये यशस्वी ठरणे म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहचणे आहे. तसेच इतर सदस्यांकडून ही इम्युनिटी हिसकावून घेण्याची सुवर्णसंधी देखील आहे. म्हणूनच बिग बॉस सदस्यांना त्यांच्या अंतिम ध्येयाच्या आणखीन एक पाऊल जवळ जाणारे “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य आज देणार आहेत. ज्यामध्ये मेघा, पुष्कर, आऊ, शर्मिष्ठा आणि त्यागराज तसेच इतर सदस्य त्यांची युक्ती लावणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण बनणार कॅप्टन हे बघणे इंट्रेस्टिंग ठरणार आहे. 


पुढे बघा, आजच्या भागाची खास झलक छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...