आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay45: टास्कदरम्यान घर पुन्हा बनलं कुस्तीचा आखाडा, बिग बॉसने केली सदस्यांची कानउघाडणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य रंगले. खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्य  कॅप्टनसीचे उमेदवार आहेत. या कार्यामध्ये यशस्वी ठरणे म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहचणे. तसेच इतर सदस्यांकडून ही इम्युनिटी हिसकावून घेण्याची सुवर्णसंधी देखील बिग बॉस यांनी सदस्यांना दिली. पण या कॅप्टनसी टास्कमध्ये सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. सुशांत आणि रेशम यांच्या नावाचे अंडे सुरक्षित करण्यामध्ये त्यांचे समर्थक यशस्वी झाले. तर मेघा आणि जुईचे नाव असलेले अंडे नष्ट करण्यात आले. 

 

घर पुन्हा बनले कुस्तीचा आखाडा... 
हे कार्य पार पाडत असताना बिग बॉसचे घर पुन्हा एकदा कुस्तीचा आखाडा बनल्याचे चित्र दिसले. काल अंडे एका फंडा या कार्यादरम्यान सदस्य शक्ती प्रदर्शन करताना दिसले, एकमेकांना ओढणे, शारीरिक हिंसा करणे यापूर्वीदेखील टास्कदरम्यान घरात दिसले होते. तेच चित्र पुन्हा एकदा या टास्कदरम्यान निरदर्शनास आले. यावरुन बिग बॉस यांनी सदस्यांना सक्त ताकीद दिली की, हा प्रकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अमान्य आहे. बिग बॉस यांनी आस्ताद, पुष्कर आणि मेघा यांना बोलावून पुन्हा एकदा घरात असा प्रकार घडणार नाही, याकडे लक्ष देण्यास सांगितले.  सदस्यांना बिग बॉस यांनी दिलेल्या आदेशावरून आज फक्त मानवी साखळीचा वापर करून सदस्याच्या नावाचे अंड समर्थकांनी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.  


आजच्या भागात सईला कोसळले रडू...  
आजच्या भागात पुष्कर, उषा नाडकर्णी, सई, शर्मिष्ठा अशा इतर सदस्यांच्या नावाची अंडी त्यांचे समर्थक आणि ते सुरक्षित करू शकतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. इतकेच नाही तर “अंडे का फंडा” या साप्ताहिक कार्यामध्ये आज स्मिताचे पुष्कर आणि आस्तादबरोबर भांडण झाल्याचे दिसणार आहे. शिवाय  सईलादेखील रडू कोसळणार आहे.   


पाहुयात, 'अंडे का फंडा' या कार्यादरम्यानची क्षणचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...