आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 52 Highlights #BBMDay52: सईने रेशमवर केला शक्तीचा वापर, नंदकिशोरने आऊंसोबत घेतला थेट पंगा

#BBMDay52: सईने रेशमवर केला शक्तीचा वापर, नंदकिशोरने आऊंसोबत घेतला थेट पंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारप्रमाणेच बुधवारीदेखील “मिशने ए कुशन” हा टास्क रंगला.  या टास्कदरम्यान सई आणि रेशमच्या टीमने एकमेकांचे पैसे चोरण्यासाठी बऱ्याच युक्त्या केल्या. रेशम आणि टीमने सईचे पैसे चोरल्याचे काल त्यांना कळाले नाही, परंतु सईने स्मिताचे पैसे चोरले हे मात्र स्मिताला कळले आणि ते सई किंवा मेघानेच चोरले असे सगळ्यांसमोर तिने ठामपणे सांगितले. पण नेहमीप्रमाणे सईने स्मिताचे पैसे चोरल्याचे कबुल केले नाही. 


रेशमने तिजोरीतील पैसे ठेवले लपवून...
रेशम या टास्कमध्ये व्यापा-याच्या भूमिकेत आहे. मध्यरात्री रेशमने त्यागराजच्या मदतीने तिजोरीतील तिचे सगळे पैसे लपवून ठेवले. तर मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास उठून मेघा आणि सई यांनीदेखील तिजोरीत पैसे आहेत की नाही, ते तपासले. त्यावेळी दोघींनाही रेशमच्या तिजोरीत पैसे नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनीही सईच्या तिजोरीतील पैसे लवपून ठेवले. 


रेशमने दिला मेघाला गोळ्या खाण्याचा सल्ला...
स्मिताकडून रेशमला सई आणि मेघा मध्यरात्री उठून तिजोरीकडे गेल्याचे समजले. त्यावर सकाळी उठल्यानंतर रेशमने मेघाला डिवचले. मेघा तू रात्री झोपेत चालतेस, म्हणून तुला औषध घेण्याची गरज असल्याचे रेशम मेघाला म्हणाली. रेशमच्या अशा बोलण्याने मेघा चांगलीच चिडली होती. घरात दोघींमध्ये बरीच वादावादी झाल्याचे यावेळी बघायला मिळाले. 

 

बिग बॉस यांनी दिले 70 उशा बनवण्याचे कार्य..  
मिशने ए कुशन या टास्कमध्ये पहिल्या राऊडंमध्ये बिग बॉस यांनी सई आणि रेशम यांच्या टीमला 30 उशा बनवण्याचे कार्य दिले होते. या कार्यात रेशमची टीम विजयी ठरली. त्यानंतर त्यांना 50 आणि नंतर 70 उशा बनवण्याचे कार्य देण्यात आले. यावेळी गोडाऊनमध्ये सामान घेताना सईने रेशमनवर एकप्रकारे हल्लाच चढवला. सईने रेशमच्या हातातील सामान हिसावून घेण्याचा प्रयत्न केला. गोडाऊनमधून बाहेर पडल्यानंतर रेशमने सईला वॉर्निंग देत पुन्हा शक्तीचा वापर केला तर आमच्याकडून त्याचा प्रतिकार करण्यात येईल, असे बजावले. यावर सईने रेशमची माफी मागितली. 


नंदकिशोर चौघुले आणि आऊंमध्ये बिनसले...
मिशने ए कुशन हे कार्य सुरु असताना नंदकिशोर चौघुले आणि आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. आऊ नंदकिशोरवर चांगल्याच वैतागलेल्या दिसल्या. 


कोण ठरणार विजयी?
मिशने ए कुशन या कार्यात आता सई आणि रेशम यांच्यापैकी कोण विजयी ठरणार? व्यापारी म्हणून दोघींपैकी कुणी चांगला व्यापार केला, हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


पुढील स्लाईड्सवर बघा, 52 व्या दिवशी घरात कसा होता माहोल... 

 

बातम्या आणखी आहेत...