आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 53 Highlights #BBMarathi: आऊंशी अरेरावी केल्याने नंदकिशोरवर चिडल्या मेघा सई, पुष्करला राग अनावर

#BBMarathi: आऊंशी अरेरावी केल्याने नंदकिशोरवर चिडल्या मेघा-सई, पुष्करला राग अनावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बुधवारी बिग बॉस मराठीच्या घरात मिशने ए कुशन हा टास्क रंगला. या टास्कदरम्यान नंदकिशोर, भूषण, त्यागराज आणि उषा नाडकर्णी यांच्यामध्ये बराच वेळ संभाषण रंगले आणि नंतर त्याचे रुपांतर वादामध्ये झाले. आज म्हणजेच गुरुवारच्या दिवशीदेखील पुष्कर आणि नंदकिशोर मध्ये चांगलेच भांडण झाल्याचे बघायला मिळणार आहे. 


नंदकिशोरने आऊंशी घेतला पंगा... 
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या वाईल्ड कार्ड एन्ट्री घरातील सदस्यांना न पटल्याचे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवले आहे. परंतु, नंदकिशोर चौघुले यांना असलेला अति आत्मविश्वास आता हळूहळू दिसून येत आहे. पन्नास दिवसानंतर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नंदकिशोर यांनी सगळ्या सदस्यांबद्दल बरीच माहिती घेऊन आल्याचा दावा तर केला आहे पण, त्यांची ही वागणूक घरामध्ये आणि घराबाहेर त्यांच्या बाजूने जाणार की त्यांच्याविरोधात? हे तर येणारी वेळेच सांगेल. 

 

आजदेखील नंदकिशोर आणि पुष्कर तसेच नंदकिशोर आणि मेघा, शर्मिष्ठा आणि सई मध्ये बराच वाद होताना दिसणार आहे. ज्यामध्ये नंदकिशोर यांची अरेरावीची भाषा आणि स्त्रीप्रती असलेली वर्तणूक बरोबर नाही याची जाणीव मेघा, शर्मिष्ठा आणि सई त्यांना करून देताना दिसणार आहेत. तसेच पुष्करचा राग देखील आज अनावर होणार आहे कारण नंदकिशोर यांचे आऊना वारंवार बोलणे बरोबर नाही, आणि या घरामध्ये त्यांच्याशी कोणीही असे वागलेले तो खपवून घेणार नाही, कारण “त्या मला आईसारख्या” आहेत असे पुष्कर नंदकिशोर यांना बजावून सांगताना दिसणार आहे.

 

परंतु या सगळ्यामध्ये नंदकिशोर यांचा काही वेगळाच हेतू असल्याचे ते भूषण याला सांगताना दिसणार आहे. आज घराला एकप्रकारे आखाड्याचे स्वरुप आल्याचे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


पाहुयात, आजच्या भागाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये...  

 

बातम्या आणखी आहेत...