आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay 57: स्मिता, शर्मिष्ठा की भूषण... कोण होणार घराबाहेर, आऊ पुन्हा भडकल्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने त्यागराज खाडिकलकर बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडले. तर सुशांत शेलार आजारी असल्याने त्याला शोचा निरोप घ्यावा लागला. हे दोघे घरातून बाहेर पडल्यानंतर सोमवारी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी ही प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडली. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली.

 

या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा, भूषण हे नॉमिनेट झाले. तर घराची कॅप्टन सईला बिग बॉस यांनी एक विशेष अधिकार देऊन घरातील एका सदस्याला या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट करायला सांगितले. सईने स्मिताला नॉमिनेट केले. सईच्या मते स्मिता कायम कन्फ्युज्ड असते आणि ती इतर जसे सांगतिल, तसा गेम खेळते, ती तिचे मत वापरत नाही. 


आस्ताद आणि स्मितावर भडकल्या आऊ
आस्तादने या नॉमिनेशन प्रक्रियेत आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांना नॉमिनेट केले. आऊंना गेम समजत नाही, असे कारण त्याने पुढे केले. त्यामुळे आऊ चांगल्याच भडकलेल्या दिसल्या. आस्तादने नॉमिनेट केल्यानंतर आऊंनी त्याला नॉमिनेट केले. मला गेम समजतो, पण घरात भांडण होऊ नये, म्हणून मी समंजस भूमिका घेते, असा आऊंनी स्पष्टीकरण दिले आणि मला नॉमिनेट केल्यामुळे मी आस्तादला नॉमिनेट करते, असे त्या म्हणाल्या. आस्तादनंतर आऊंनी स्मिताला नॉमिनेट केले. स्मिता काहीही झाले, की माझ्यावरच येते, ती सतत कन्फ्युज्ड असते, असे आऊ म्हणाल्या. 

 

अशा प्रकारे 57 व्या दिवशी घरातील सदस्यांनी केलेल्या नॉमिनेशननुसार या आठवड्यात घराबाहेर होण्यासाठी शर्मिष्ठा, भूषण आणि स्मिता नॉमिनेट झाले आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर हे बघणे रंजक असणार आहे.


पाहुयात, सोमवारी बिग बॉसच्या घरात पार पडलेल्या नॉिमनेशन प्रक्रियेची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...