आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay58: सदस्यांना मिळणार बिग सरप्राइज, स्मिताच्या आईमुळे पाणावतील आऊंचे डोळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता गोंदकरच्या आईने आऊ अर्थातच उषा नाडकर्णींची भेट घेतली. - Divya Marathi
स्मिता गोंदकरच्या आईने आऊ अर्थातच उषा नाडकर्णींची भेट घेतली.

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य आता नवव्या आठवड्यामध्ये पोहचले असून संयमासोबतच आत्मनिग्रह तपासून बघण्याची वेळ आली आहे. यासाठी बिग बॉस सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्याअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉस यांनी खूप सुंदर असे सरप्राईझ देणार आहेत.

 

आज घरामध्ये उषा नाडकर्णी यांचा मुलगा, स्मिताची आई तसेच सईची आई येणार आहेत. उषा नाडकर्णी यांचा मुलगा नंदकिशोर यांच्याप्रती त्याची नाराजगी व्यक्त करताना दिसणार आहे आणि त्यांनी जे काही केले ते चुकीचे केले असे देखील सांगणार आहेत. स्मिताची आई घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा आऊ यांना भेटणार आहेत. स्मिताची आई आऊंना त्यांच्या मुलीला सांभाळून घेण्याची विनंती करताना दिसतील. स्मिताच्या आईच्या विनंतीमुळे आऊंचे डोळे पाणावलेले दिसतील. तर दुसरीकडे सई आईला बघून खूपच भाऊक होणार आहे. प्रत्येक सदस्याच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना एक संदेश दिला.

 

आज कोणाकोणाला हे सरप्राईझ मिळेल ? कोणाचे परिवारातील सदस्य भेटायला येतील ? आणि ते काय व्यक्त होतील ? हे आजच्या भागात बघायला मिळणार आहे. 

 

पाहुयात, आजच्या भागाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये..

बातम्या आणखी आहेत...