आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BBMDay58: रेशम म्हणाली मुलीला, मी येईपर्यंत माझे सगळे पैसे संपवू नकोस!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्याअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच सई, रेशम, स्मिता आणि आऊ यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. रेशमची मुलगी काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली आणि तिने सगळ्यांना आपलेसे केले. 

 

मुलीला बघून रेशमला कोसळले रडू...

गेल्या आठ आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात सर्व सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून राहात आहेत. एवढ्या दिवसांत त्यांचा त्यांच्या कुुटुंबाशी संपर्क झाला नाही. रेशम घरात कायम मुलांची आठवण काढताना दिसले. कालच्या भागात रेशमला मिळालेले सरप्राइज म्हणजे तिची मुलगी तिला भेटायला घरात आली होती. रिशिका हे रेशमच्या लेकीचे नाव आहे. मुलीला बघताच रेशमला अश्रू अनावर झाले. पण त्यावेळी बिग बॉस यांनी रेशमला फ्रीज होण्याचा आदेश दिला होता. रिलीज होताच रेशम मुलीला जाऊन बिलगली. 

 

रेशम मुलीला मस्करीत म्हणाली, माझे सगळे पैसे संपवू नकोस...

ब-याच दिवसांनी मुलीला भेटण्याचा आनंद रेशमच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता. दोघींमध्ये बराच वेळ गप्पा रंगल्या. यावेळी रिशिकाने रेशमला नवीन हेअरकट केल्याचे सांगितले. तर रेशम मस्करीत तिला म्हणाली, मी बाहेर येईपर्यंत माझे सगळे पैसे संपवू नकोस. यावेळी माय-लेकीतील स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळाली. 

 

रिशिका म्हणाली, रेशम-मेघामध्ये होऊ शकते चांगली मैत्री...

यावेळी रिशिकाने घरातील सर्वच सदस्यांची भेट घेतली. विशेषतः मेघा आणि रेशम या दोघीही चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात, असे ती म्हणाली. दोघींमध्ये ब-याच गोष्टींत साम्य आहे. त्यामुळे भांडू नका, असेही ती म्हणाली. सई, शर्मिष्ठा, भूषणसह सगळ्यांनीच यावेळी रिशिकाचे कौतुकदेखील केले. 

 

पाहुयात, बिग बॉसच्या घरातील रिशिकाची खास छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...