आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Bossची सईसोबत वेगळीच खेळी, होऊ दिले नाही माय-लेकीचे बोलणे, रडूनरडून सई बेहाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले होते. याअंतर्गत काही सदस्यांच्या कुटुंबीयांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली होती. आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांना भेटायला त्यांच्या मुलगा अभिजीत आला होता. तर रेशमची मुलगी रिशिका काल घरात आली होती. स्मिता गोंदकरला भेटायला तिची आई आली होती. या तिघांनाही त्यांच्या कुटुंबीयांसोबत बोलण्याची संधी बिग बॉस यांनी दिली होती.

 

पण सई लोकूरच्या बाबतीत मात्र बिग बॉस यांनी वेगळीच खेळी खेळली. सईला भेटायला तिची आई काल बिग बॉसच्या घरात आली खरी, मात्र सईला बिग बॉस यांनी शेवटपर्यंत फ्रीज राहण्याचा आदेश दिला होता. तिची आई घराबाहेर जाईपर्यंत बिग बॉस यांनी सईला रिलीज केले नाही, त्यामुळे तिला तिच्या आईशी एक शब्दही बोलता आला नाही. आई न बोलता निघून गेल्याने सईला अश्रू अनावर झाले होते. तिने बिग बॉस यांना आईला भेटू देण्याची विनंतीदेखील केली. मात्र तिची ही विनंती मान्य झाली नाही. सईची आई कन्फेशन रुममधून सईची अवस्था बघत होत्या. त्यांना देखील सईला रडताना बघून अश्रू अनावर झाले होते. मेघा आणि शर्मिष्ठा यांनी सईची समजूत घालत हीच धैर्याची वेळ असून हाच टास्क असल्याचे सईला सांगितले.  

 

सईच्या आईने घेतली घरातील सदस्यांनी भेट... 

सईच्या आईने घरातील सर्वच सदस्यांची भेट घेतली. शर्मिष्ठाच्या गालावरचे डिंपल आवडत असल्याचेही त्या म्हणाल्या. तर रेशम आवडती स्पर्धक असल्याचे त्यांनी तिला सांगितले. आऊंना तुम्ही सईच्या आजीच्या वयाच्या आहात, त्यामुळे तुम्ही तिला रागवा, तिला ओरडा, असेही त्या म्हणाल्या. आस्ताद सतत सईला तिच्या जोरात बोलण्यावरुन टोकत असतो. त्यावर घरातील आम्ही सगळेच मोठ्या आवाजात बोलतो, त्यामुळे कदाचित सईसुद्धा मोठ्याने बोलते, असे सईच्या आईने आस्तादला सांगितले. मेघाचे त्या लाड करताना यावेळी दिसल्या.

 

पाहुयात, बिग बॉसच्या घरातील सईच्या आईची छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...