आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay58: स्मिताच्या आईने दिला बिकिनी घालण्याचा सल्ला, अशा होत्या सदस्यांच्या रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्याअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. सईची आई तिला भेटायला घरी आली होती. तर रेशम आणि आऊ यांची मुलेदेखील काल घरात आली होती. स्मिता गोंदकर हिला भेटायला तिची आई जानकी या बिग बॉसच्या घरी आल्या होत्या. स्मिताच्या आईने स्मिताला बरेच सल्ले दिले तिचे मार्गदर्शन केले आणि तिचे मनोबल वाढवले.

 

सांगितले बिकिनी घालायला...  

अलीकडेच एका एपिसोडमध्ये स्मिताने स्विमिंग पूलमध्ये घरातील इतर सदस्यांसोबत धमाल केली. हा एपिसोड बघितल्यानंतर स्मिताच्या आईने तिला बिकिनी का घालत नाहीस, असा प्रश्न विचारला आणि नक्की बिकिनी घाल, असेही सांगितले. 

 

बिनधास्त उत्तरे देण्याचा दिला सल्ला...

मराठी नीट बोलता येत नाही, म्हणुून गप्प राहू नकोस. नॉन महाराष्ट्रीय मुलगी इथवर पोहोचली याचा मला अभिमान आहे. त्यामुळे भाषेचा न्यूनगंड न बाळगता बिनधास्तपणे बोल, असेही स्मिताची आई तिला म्हणाली. 

 

आऊंना केली स्मिताला सांभाळून घेण्याची विनंती... 

जानकी गोंदकर यांनी आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांना घरात स्मिला सांभाळून घ्या, अशी त्यांना विनंती केली. स्मिता मराठी शिकलेली नाही, त्यामुळे तिला नीट मराठी बोलता येत नाही. तिचा स्वभाव खूप शांत आहे, तिच्यावर रागावू नको, ती मला तुमच्यात बघते, असेही जानकी यावेळी आऊंना म्हणाल्या. यावेळी जानकी गोंदकर आणि उषा नाडकर्णी या दोघींचेही डोळे पाणावले होते. 

 

घरातील सर्व सदस्यांचे केले कौतुक..

एका टास्कदरम्यान आस्तादने स्मिताला घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी टक्कल केले होते. ते बघताना ऊर भरुन आल्याचे जानकी यांनी यावेळी आस्तादला सांगितले. मेघाचेही त्या लाड करताना दिसल्या. भूषणला बघून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. घरातील प्रत्येक सदस्याचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. 

 

स्मिताच्या आईला भेटल्यानंतर अशा आल्या घरातील सदस्यांच्या रिअॅक्शन...

स्मिताच्या आई जानकी या बोलक्या स्वभावाच्या असून त्यांना बिग बॉसच्या घरात किमान एक दिवस राहू द्या, अशा प्रतिक्रिया घरातील सदस्यांच्या आल्या. जानकी यांना भेटून सगळेच अतिशय आनंदी दिसले. माझी आई खूप बडबड करते, असे स्मिताने यावेळी सगळ्यांना सांगितले. जानकी या मनमिळाऊ असल्याचे घरातील सदस्यांचे म्हणणे होते. 

 

पाहुयात, जानकी गोंदकर यांची बिग बॉस मराठीच्या घरातील निवडक छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...