आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay58: आठ आठवडे झाले तरी गेम खेळता येत नाही, आऊंच्या मुलाने विचारला सवाल!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मंगळवारी बिग बॉस यांनी सदस्यांवर फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपावले. या कार्याअंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच सई, रेशम, स्मिता आणि आऊ यांना बिग बॉसतर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. या सदस्यांचे कुटुंबीय काल त्यांना भेटायला आले होते. घरात सर्वप्रथम एंट्री घेतली ती आऊ अर्थातच उषा नाडकर्णी यांचा मुलगा अभिजीतने. अभिजीतने घरात प्रवेश करताच बिग बॉस यांनी सर्व सदस्यांना फ्रीज होण्याचा आदेश दिला. अभिजीतने घरातील प्रत्येक सदस्याची भेट घेतली.

 

नंदकिशोर आणि स्मिताला सुनावले खडे बोल...  

अभिजीतने घरातील सदस्य स्मिताची भेट घेऊन आधी फुल देते आणि नंतर ट्युबलाइट म्हणते, असं करु नकोस, असं स्मिताला म्हटले. त्यानंतर नंदकिशोरची भेट घेऊन मागील आठवड्यात तुम्ही घरात जे काही वागलात, ते मुळीच आवडलं नसल्याचं अभिजीतने नंदकिशोरला सांगितले. गेम खेळताना कदाचित ती तुमची स्ट्रॅटेजी असेल, पण असं करताना कुणाचा अपमान होणार नाही, याकडे लक्ष द्या, असेही अभिजीतने म्हटले. नंदकिशोर जे काही वागले, ते बघून खूप वाईट वाटले, असेही अभिजीतने यावेळी म्हटले. मस्करी एका सीमेपर्यंत करा, ती सीमा ओलांडून नका, असेही त्याने म्हटले. 

 

आऊंना दिला सल्ला, ऐकावे जनाचे करावे मनाचे...

अभिजीत बघून आऊंना अश्रू अनावर झाले होते. अभिजीतने आपल्या आईला सावरत त्यांना मोलाचा सल्लादेखील दिला. आठ आठवडे झालेत, तरी अजून गेम खेळता येत नाही का... असा प्रश्न अभिजीतने त्याच्या आऊंना विचारला. टीमला पाठिंबा दे, सगळ्यांचं ऐक,  पण स्वतंत्र खेळ, स्वतःचं डोकं चालवं. इथे प्रत्येक जण जिंकायला आलंय, त्यामुळे स्वतःदेखील खेळ, असा सल्ला अभिजीतने यावेळी आऊंना दिला. स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस, असेही तो आऊंना म्हणाला.   

प्रत्येक जण छान खेळतोय..

 

अभिजीतने आस्ताद, रेशम, सई, मेघा, शर्मिष्ठा यांची भेट घेऊन घरातील प्रत्येक सदस्य छान खेळतोय, असे अभिजीतने घरातील सर्व सदस्यांना सांगितले. 

 

पाहुयात, बिग बॉसच्या घरातील अभिजीतची खास छायाचित्रे...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...