आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay59 : मुलाला बघून ढसाढसा रडला भूषण, मेघाच्या मुलीने दिली तिला सक्त वॉर्निंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉसच्या घरात गेले दोन दिवस सदस्यांना बिग बॉस यांच्याकडून सुंदर सरप्राइज मिळाले. तब्बल दोन महिन्यांनी कुटुंबीयांना भेटल्याने सगळेच स्पर्धक प्रचंड भावूक झालेत. रेशम, आऊ, स्मिता आणि सई यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काल पुष्कर, भूषण आणि शर्मिष्ठा यांची त्यांच्या कुटुंबीयांसोबत भेट घडली. शर्मिष्ठाला भेटायला तिची धाकटी बहीण सुप्रिया काल घरात आली होती. सुप्रियाने शर्मिष्ठाला कसा गेम खेळायचा यावर मार्गदर्शन केले.  ताई तू ग्रुपसोबत खेळताना कुठेच दिसत नाही, तू मला दिसली पाहिजे, असे सुप्रिया शर्मिष्ठाला म्हणाली. 


भूषणची पत्नी आणि मुलगा आले भेटीला... 
सदस्यांशी गार्डन एरिआत गप्पा मारत बसलेल्या भूषणला मोठं सरप्राइज मिळालं. बिग बॉसच्या घराचं मुख्य दार अचानक उघडलं आणि त्याचा मुलगा प्रकीर्तन आत आला. आपल्या मुलाला अचानक पाहून भूषण काही वेळ स्तब्धच झाला पण मुलानं मिठी मारल्यावर मात्र त्याला रडू कोसळलं. भूषणची बायको कादंबरीने भुषणला मार्गदर्शन केले आणि त्याची हिंमत देखील वाढवली. भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले की,  ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले की, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळेल.   


मेघाला भेटली मुलगी आणि आई... 
मेघाची मुलगी साक्षीदेखील घरात आली आणि तिनं सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या आईला साथ देणाऱ्यांचे तिनं आभार तर मानले शिवाय ज्यांच्या मनात मेघाविषयी राग आहे त्यांना आपली आई ते विचार करतात तशी वाईट नाही हेदेखील पटवून दिले. साक्षीला पाहून मेघालाही अश्रू अनावर झाले. यावेळी साक्षीने मेघा आणि सईला एक निरोप देत पुष्करपासून सावध राहण्यास सांगितले. जाताना ट्रॉफी जिंकून ये, नाही तर तुला घरात घेणार नाही, अशी काहीशी प्रेमळ वॉर्निंग मेघाच्या मुलीने तिला दिली. इतकेच नाही तर घरातील इतर सदस्यांविषयी गॉसिपिंग करु नकोस, ते बघताना चांगले दिसत नाही, असेही सईने मेघाला सांिगतले. मेघाच्या आईने घरातील सर्व सदस्यांसाठी शिरा आणला होता. 


ढसाढसा रडला पुष्कर... 
मेघा आणि भूषणप्रमाणेच काल पुष्कर जोगला देखील तितकेच गोड सरप्राइज मिळाले. त्याची बायको जॅस्मिन घरात आली आणि पुष्कर ढसाढसा रडू लागला. आपल्या मुलीला फेलिशाला घरात का आणले नाही असा प्रश्नही तो सतत विचारत होता. आजच्या भागात पुष्करची त्याच्या चिमुकलीसोबत भेट होणार आहे. 


पाहुयात, बिग बॉस मराठीच्या कालच्या भागाची क्षणचित्रे...  

 

बातम्या आणखी आहेत...