आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BBday6: मेघा आणि आरतीची झाली पुन्हा मैत्री! रहिवाश्यांना मिळाले पहिले Luxury बजेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता दुसरा कॅप्टन मिळाला आहे. सर्वमताने आस्ताद काळेची निवड कॅप्टनपदी झाली आहे. आता यानंतर रहिवाशी संघामध्ये एकच चर्चा ऐकायला मिळत आहे आणि ती म्हणजे Luxury बजेट किती मिळेल.  बजेट चांगले मिळाले आहे, त्यामुळे गरजेच्या गोष्टीच मागवुया, असा सल्ला कॅप्टन झालेल्या आस्तादने सगळ्यांना दिला. त्याला घरातील सर्व सदस्यांनी संमती दिल्याचे आजच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आजच्या भागात आणखी काय-काय बघायला मिळणार, टाकुयात यावर एक नजर... 

 

मेघा आणि आरतीची पुन्हा मैत्री... 
बिग बॉसच्या घरामध्ये पडत असलेल्या ग्रुपचा फायदा दोन जुन्या मैत्रिणींना झाला. मेघा आणि आरती यांच्या मैत्रीमध्ये काही कारणांमुळे आलेला दुरावा याच कार्यक्रमामुळे दूर होत आहे असे दिसून येणार आहे. मेघा आणि आरती काही वर्षांपूर्वी खूप चांगल्या मैत्री होत्या. मेघाने कार्यक्रमामध्ये आरतीला तिचा पूर्ण आधार आहे असे देखील सांगणार आहे. मेघा आणि आरतीमध्ये घरामध्ये तयार होत असलेल्या ग्रुप बद्दल देखील चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये मेघाने आरतीला आपण एकत्र होऊन खेळण्याची गरज आहे असे सांगणार आहे.

 

इमोशनल होताना दिसतील सेलिब्रिटी स्पर्धक... 
घरातील सदस्यांना थोडी थोडी त्यांच्या घरच्यांची आठवण येते आहे हे दिसून येणार आहे. ऋतुजा आणि सई या दोघींनाही घरच्यांची आठवण येत असून त्यांनी ही गोष्ट पुष्कर जवळ सांगितली. सईने पुष्करला तिच्या मनामध्ये नक्की काय आहे सांगणार असून पुष्कर सईला समजविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सईशी घरातील सगळे सदस्य चांगले वागत असून, आता नॉमिनेट कसं करायचं ? कोणाला करायचं ? काय कारण द्यायचं ? आणि बिग बॉसच्या घरामध्ये रहाणं खूप कठीण आहे आणि ते का कठीण आहे हे सगळं पुष्करला सांगणार आहे त्यावर खूप उत्तमरीत्या पुष्करने सईचे सांत्वन करताना दिसेल आणि कसा तो देखील या घरामध्ये रहाण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगणार आहे. 

 

रंगणार अंताक्षरी.. 
बिग बॉसच्या घरामध्ये अंताक्षरीचा आणि इतर खेळ रंगतात पण आता विनीतची इच्छा घरच्यांनी शेवटी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून घरात रंगला चमचा – लिंबूचा खेळ. घरामध्ये आता वातावरण जरा गंभीर झाले आहे. कारण उद्या कोण घरामधून बाहेर जाईल याचा निर्णय होणार आहे. तसेच रंगणार विकेंडचा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत. आता आज कोण घराबाहेर जाईल ?  याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 
पुढील स्लाईड्सवर बघा, आजच्या भागातील घरातील निवडक फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...