आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay60: आज पुष्करची होणार त्याच्या चिमुकलीशी भेट, आस्तादला मिळणार सरप्राइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील रंगले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. मेघाची मुलगी आणि आई तिला भेटायला आल्या होत्या. तर भूषणचा मुलगा आणि पत्नी कादंबरी यांनी त्याची भेट घेतली. शर्मिष्ठाची लहान बहीण सुप्रिया काल बिग बॉसच्या घरात आली होती. 


आज आस्तादला मिळणार सरप्राइज... तर पुष्करची होणार त्याच्या चिमुकलीसोबत भेट..
कालच्या भागात पुष्करचीदेखील त्याची पत्नी जास्मिनसोबत काल भेट झाली. जास्मिनने यावेळी त्यांची चिमुकली आता मोठी झाल्याचे त्याला सांगितले. आजच्या भागात पुष्कर त्याच्या चार महिन्यांच्या चिमुकलीला भेटणार आहे. आस्ताद काळेलादेखील बिग बॉस यांच्याकडून एक सरप्राइज मिळणार आहे. आजच्या भागात आस्तादचे वडील त्याला भेटायला बिग बॉसच्या घरात येणार आहे. आज एकदा पुन्हा घरात स्पर्धकांचे कुटुंबीयांना भेटतानाचे भावूक  क्षण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.


कुटुंबीयांच्या भेटीनंतर आज घरात रंगणार नवीन टास्क... 
घरातील सर्वच सदस्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आता आज घरातील सदस्यांना बिग बॉस यांनी दिलेले फ्रीज-रीलीझ हे कार्य संपणार असून नवीन टास्कला सुरुवात होणार आहे. “हेल्थी स्माईल” हे नवीन टास्क आज घरातील सदस्यांना देण्यात येणार आहे. या कार्याअंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम A – दात,  टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी असणार आहेत. टीम A ला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी असणार आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार? कोणत्या टीममध्ये कोणते सदस्य असणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 


पाहुयात, आजच्या म्हणजेच बिग बॉसच्या घरातील साठाव्या दिवसाची एक झलक छायाचित्रांमध्ये... 

 

बातम्या आणखी आहेत...