आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 60 Highlights #BBMDay60: कुटुंबीयांच्या येण्याने दिसला हसू रडूचा खेळ, पुष्करची इच्छा अखेर झाली पूर्ण

#BBMDay60: कुटुंबीयांच्या येण्याने दिसला हसू-रडूचा खेळ, पुष्करची इच्छा अखेर झाली पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठीच्या घरात फ्रीज आणि रिलीजच्या टास्कमध्ये बिग बॉस यांनी घरातील सर्वच सदस्यांना सुंदर सरप्राइज दिले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सदस्यांमध्ये मुळीच भांडण झालेले दिसले नाही. घरातील सर्वच सदस्यांना भेटायला एकेक करुन त्यांचे कुटुंबीय आले होते. कालच्या भागात पुष्करची त्याच्या चिमुकलीला भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. पुष्कर शोमध्ये आला तेव्हा त्याची मुलगी फेलिशा ही फक्त तीन महिन्यांची होती. गेल्या दोन महिन्यांपासून पुष्करने त्याच्या मुलीला पाहिले नव्हते. घरात काल फेलिशाला बघून पुष्करला अश्रू अनावर झाले. आता रडणार नाही, हा खेम मनापासून खेळेल, असे वचन पुष्करने पत्नी जास्मिनला दिले. 

 

नंदकिशोरची पत्नी पोहोचली बिग बॉसच्या घरात...

घरातील इतर सदस्यांप्रमाणेच नंदकिशोरलादेखील सुंदर सरप्राइज मिळाले. त्याला भेटायला त्याची पत्नी सुप्रिया आली होती. सुप्रियाने घरातील सगळ्या सदस्यांची भेट घेतली आणि आऊंकडे एक विनंतीदेखील केली. मुलगा समजून नंदकिशोरला माफ करा, असे सुप्रिया आऊंना म्हणाली.

 

आस्तादच्या वडिलांनी घेतली सदस्यांची शाळा!

आस्तादला भेटायला त्याचे वडील काल बिग बॉसच्या घरात आले होते. यावेळी त्यांनी आस्तादच्या आईने बनवलेले रव्याचे लाडू सगळ्यांसाठी आणले होते. खरं तर घरात काही सदस्य आस्तादच्या शुद्ध मराठीची कधीकधी थट्टा करताना दिसतात. यावरुन आस्तादच्या वडिलांना घरातील सदस्यांची गोड शब्दांत जणू शाळाच घेतली. आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान असल्याचे त्यांनी घरातील सदस्यांना सांगितले. बराच वेळ आस्तादने त्याच्या वडिलांशी गप्पादेखील मारल्या. यावेळी वडिलांनी आस्तादला त्याची भावी पत्नी अर्थातच स्वप्नालीचा एक मेसेजदेखील दिला. घरात आता जसा तू आहेस, जो बदल तुझ्यात घडला आहे, तसाच या शोमधून बाहेर पडल्यानंतर राहा, हा स्वप्नालीचा मेसेज आस्तादच्या वडिलांनी त्याला दिला. 

 

एकंदरीतच तब्बल दोन महिन्यांनी कुटुंबीयांच्या भेटीने घरातील सर्वच सदस्य सुखावले, असे म्हणायला हरकत नाही. आजच्या भागात पुन्हा एकदा हे सर्व सदस्य पुर्वीप्रमाणेच भांडताना, टास्क करताना दिसणार आहेत. 

 

पाहुयात, कालच्या भागाची खास झलक छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...