आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay65: रेशमसह सहा सदस्य झाले नॉमिनेट, आज नंदकिशोर बनणार हुकुमशाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  काल सदस्यांना “बोचरी टाचणी” हे नॉमिनेशन कार्य सोपवले. ज्यानुसार बझर वाजल्यानंतर फुगे फोडत सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. तसेच कोण कोणाला नॉमिनेट करणार यावर सदस्यांमध्ये बरीच चर्चा देखील झाली. या कार्यामध्ये मेघा, आस्ताद, सई, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे नॉमिनेट झाले. त्यानंतर बिग बॉस यांनी पुष्करला एक विशेष अधिकार दिला ज्याद्वारे तो नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याला सुरक्षित करू शकतो आणि त्याने सईला सुरक्षित केले. त्यानंतर त्याला अजून एक अधिकार दिला ज्यानुसार त्याला एकाला घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट करायचे होते आणि त्याने रेशमला नॉमिनेट केले. 

 

आज बिग बॉस सदस्यांना “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सोपवणार आहेत. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नंदकिशोर बनणार आहेत हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा असणार आहेत. आता “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये काय घडणार ? कोणाचा संयम सुटणार ? कोण संयमाने खेळणार ? हे बघणे रंजक ठरणार आहे. 

 

पाहुयात, आजच्या भागाची क्षणचित्रे...

बातम्या आणखी आहेत...