आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Day 69 Highlights #BBMDay69: रेशम झाली घराची नवीन कॅप्टन, मेघाने केले स्मिताविषयी वादग्रस्त वक्तव्य

#BBMDay69: रेशम झाली घराची नवीन कॅप्टन, सई-रेशम-मेघात झाली शाब्दिक चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजा हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये यशस्वी ठरली. आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. 

 

“द ग्रेट डिक्टेटर” या कार्यानंतर घरात रंगला कॅप्टनसीचा टास्क...

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे सदस्य जिंकण्यासाठी आले आहेत. आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखीन अवघड होत जाणार आहे. त्यासाठीच ध्येयाच्या आणखीन जवळ नेण्यासाठी बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवले होते. या  टास्कमध्ये घरातील सर्व सदस्यांनी एकमताने रेशम, सई आणि नंदकिशोर यांची कॅप्टनसीचे उमेदवार म्हणून निवड केली. हा टास्क सुरु झाल्यानंतर मेघाच्या सततच्या लूडबुडीने रेशमचे तिच्यासोबत चांगलेच खटके उडताना दिसले. 

 

सई आणि रेशममध्येही झाली बाचाबाची... 

टास्क सुरु झाल्यानंतर सई आणि रेशममध्ये देखील बरीच बाचाबाची बघायला मिळाली. रेशमला गार्डन एरियात जाऊन टास्क खेळायचा होता, तर सई मात्र त्यासाठी तयार होत नव्हती. त्यावरुन दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. या खेळातून नंदकिशोर सर्वप्रथम आऊट झाले. त्यानंतर रेशम आणि सई यांच्यात टास्क रंगला. पण पाठीचे दुखणे असह्य झाल्याने सईने गेम क्विट केला आणि रेशम घरातील नवीन कॅप्टन झाली. 

 

पाहुयात, कालच्या भागाची एक झलक छायाचित्रांमध्ये...

 

 

बातम्या आणखी आहेत...