आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay69: महेश मांजरेकरांनी घेतली आस्तादची शाळा, असा होता विकेंडचा डाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बिग बॉसच्या घरात आपल्याला घरातील सदस्यांचे वेगवेगळे रंग बघायला मिळत आहेत. प्रत्येक आठवड्यात काहीना काही नवा ट्विस्ट येत असतो. हा आठवडाही चांगलाच रंजक ठरला. आठवड्याच्या सुरुवातीला 'द ग्रेट डिक्टेटर' हा टास्ट झाला. या टास्क दरम्यान झालेल्या वाद विवादांविषयी मांजरेकरांनी सर्वांचीच शाळा घेतली. यामध्ये आस्ताद हा महेश मांजरेकांच्या निशान्यावर होता. महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला घरातील बिग बॉस कोण वाटतो तर जास्तीत जास्त लोकांनी आस्तादच नाव घेतलं. यामुळे महेश मांजरेकरांनी आस्तादची चांगलीच शाळा घेतली.

 

पर्सनल विषय काढल्यामुळे भडकले मांजरेकर
महेश मांजरेकांनी किशोर आणि स्मिताचीही चांगलीच शाळा घेतली. किशोर याने पुष्करच्या कामाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन महेश मांजरेकांनी त्याची शाळा घेतली. किशोर स्मिताविषयीही बोलला होता. तो सर्वांच्या पर्सनल गोष्टींवर वादग्रस्त वक्तव्य करत होता. तर स्मिता हिलाही मांजरेकांनी चांगलेच सुनावले. स्मिता मेघाच्या केसांच्या ट्रिटमेंटविषयी वादग्रस्त बोलली होती. यावरुन तिची चांगली शाळा घेतली. 'विकेंडचा डाव' मध्ये यावेळी कुणीही बेघर झालेलं नाही. परंतू महेश मांजेकरांनी घेतलेली शाळा खुपच परिणामकारक असल्याचे वाटते. आता घरातील सदस्य पुढच्या आठवड्यात काय काय रंग दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'विकेंडचा डाव'मधील घरातील सदस्यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...