आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay73: ...म्हणून आस्ताद करणार निषेध, घरात पुन्हा होणार या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. काल सई आणि शर्मिष्ठाचे फोटो लपविण्यावरून झालेले भांडण चांगलेच रंगले. तसेच आस्तादने देखील नळाच्या टास्कदरम्यान भूषण कडूला टेंगुळ आले होते ही गोष्ट एक वेगळ्या प्रकारे ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केली. तसेच सईने काल डोळ्यावर पट्टी बांधून ऑम्लेट बनवले. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज बिग बॉस मराठीतील सदस्य बिग बॉस न्यूज मध्ये सादर करत आहेत. आजदेखील रंगणार काल “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य. सदस्य हा सगळा खटाटोप  कॅप्टनसीची उमेदवारी मिळविण्यासाठी  करत आहेत. “होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये आजसुध्दा बऱ्याच ब्रेकिंग न्यूज बघायला मिळणार आहेत.  


 आऊ देणार अनिल थत्तेबद्दलची ब्रेकिंग न्यूज... आस्ताद करणार निषेध
आज “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊ अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज देणार आहेत. तसेच पुष्कर त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी देणार आहे ते म्हणजे एक छान नृत्य सादर करून. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक होणार आहे. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नसावा हे त्यामागचे कारण असू शकते. कारण आस्तादचे म्हणणे असणार आहे, “सकारात्मक गोष्ट सोडून जर मनातील भडास निघण्यासारखी एक गोष्ट अधोरेखित करून दाखवायची असेल तर या विचारसरणीला माझा विरोध आहे ... म्हणून मी निषेध करतो”. नक्की काय घडले ? हा गुंता मेघा आणि सई कसा सोडवणार ? हे बघणे रंजक असणार आहे.


आज सदस्यांना मिळणार ट्रीट... 
वटपौर्णिमा महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचे मानले जाणारे व्रत. यानिमित्ताने घरातील सदस्यांना रुचकर पदार्थ बनविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. बिग बॉसतर्फे चविष्ठ पदार्थांचा आनंद लुटण्यासाठी जेमेनी रिफाईंड कुकिंग ऑईल प्रस्तुत “आरोग्यमय आहार” हे कार्य देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आऊ आणि शर्मिष्ठा मिळून पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवणार आहेत.

 

एकंदरीतच “होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे हे बघणे रंजक असणार आहे कोणाला मिळेल ही सुवर्णसंधी.  

 

पाहुयात, आजच्या भागाची क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...