आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay74: अखेर सई-मेघाच्या मैत्रीत पडणार फूट, सईचे मेघा, आऊ,शर्मिष्ठासोबत होणार भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  कालसुध्दा “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. या कार्यात पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. काल “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊंनी अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तसेच पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी दिली ते म्हणजे एक छान नृत्य. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सईबरोबर शाब्दिक चकमक झाली. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नाही आणि त्या विचारसरणीला विरोध दर्शवून त्याने निषेध केला. नंतर मेघा आणि सईने त्यांचा निर्णय बदलून शर्मिष्ठाचे नावं ब्रेकिंग न्यूज मधून काढून आऊ आणि पुष्करचे नावं अंतिम केले. आज पुष्कर आणि आस्ताद मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. तर सई, मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा आज भांडण होणार आहे. 


सई होणार मेघा, आऊ आणि शर्मिष्ठावर नाराज... 
पुष्करच्या बातम्या “होउ दे चर्चा” या टास्क मध्ये चार वेळा सर्वोत्तम बातम्या ठरल्यामुळे तो कॅप्टनसीचा पहिला उमेदवार ठरणार आहे. तसेच बिग बॉस मेघा, आस्ताद आणि सई मधून घरातील सदस्यांच्या मताने कोणा एका सदस्याची कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी निवड करायला सांगणार आहेत. आणि यावरूनच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बरेच वाद रंगणार आहेत. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा वर नाराज होणार आहे. कारण, मेघा आणि शर्मिष्ठा त्यांची मते आस्तादला देणार आहेत. सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा यांच्यावर चिडणार असून आता त्यांची तिला या स्पर्धेमध्ये गरज नाही आणि तिच्याकडून कुठल्याही प्रकारचा पाठींबा यापुढे त्यांनी मागू नये असे सई त्यांना सांगणार आहे.


घरात आज रंगणार 'एक डाव नावाचा' हे कार्य 
कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात हे महत्व अधोरेखित करण्यासाठीच आज बिग बॉस “एक डाव नावाचा” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचे महत्व अधोरेखित करणे हे या कार्याचे उद्देश आहे. कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन ? मेघा आणि सईचे भांडण कोणत्या टोकाला जाणार ? हे  आजच्या भागात बघणे रंजक ठरणार आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आजच्या भागाची निवडक क्षणचित्रे...

बातम्या आणखी आहेत...