आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay74 : शर्मिष्ठा आणि मेघा झाल्या भाऊक! बिग बॉसकडून सदस्यांना आगळावेगळा टास्क

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. यावरून शर्मिष्ठा खूपच भाऊक झाली. “पुष्कर आणि सई आता माझ्यासोबत नाही जे माझ्या खूप जवळचे मित्र होते, आऊ घराबाहेर गेल्यानंतर मलासुध्दा तितकेच वाईट वाटले आहे” असे सांगत मेघा शर्मिष्ठाला आज आधार देण्याचा प्रयत्न करणार आहे. मेघाने सई, पुष्कर, शर्मिष्ठा यांना न सांगता आस्तादला दिलेल्या मतामुळे त्यांच्या मैत्रीत वादाची ठिणगी पडली. सई आणि पुष्करने तर आता मेघावर विश्वास ठेऊ शकत नाही असे सांगितले. काल झालेल्या छोट्याशा खेळामध्ये देखील जेंव्हा खंजीर देण्याची वेळ आली तेव्हा सई आणि बाकीच्या काही सदस्यांनी मेघाचेच नावं घेतले. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बदलेली ही नाती नक्की पुढे कोणते बदल घरामध्ये आणतील हे बघणे रंजक असणार आहे. 

 

आज बिग बॉस सगळ्यांना आगळावेगळा टास्क देणार आहेत. बिग बॉस यांच्या असे निदर्शनास येणार आहे गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्वाचा नियम आज बिग बॉस शिथिल करणार आहेत. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी आहे. पण यामध्ये बिग बॉस एक अट घरातील सदस्यांना देणार आहेत. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तास असेल. 


आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील ? कोणती आव्हानं त्यांच्यासमोर येतील ? हे बघणे रंजक असणार आहे.  

 

बघा आजच्या एपिसोडची निवडक क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...