आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay76: मेषा-सईचा अबोला कायम, पुष्करने केला जुळवाजूळव करण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बिग बॉसच्या घरात कुणीही कुणाच नसतं. सर्वांना आपापला गेम खेळत असतात. बिग बॉसच्या घरात जवळचे मित्र कधी एकमेकांविरुध्द उभे राहतील हे सांगता येत नाही. सध्या घरातही असेच काही सुरु आहे. घरातील सख्ख्या मैत्रिणी असणा-या मेघा आणि सई यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. दोघींचे भांडण झाले आहे. सईला आता मेघासोबत बोलायची इच्छा नाही. त्यांचा मित्र असलेल्या पुष्करने दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला परंतू काहीही परिणाम झाला नाही. दोघींचा अबोला कायम आहे. 

 

यामुळे झांले भांडण
घरातील कॅप्टन निवडायचा होता. यासाठी बिग बॉसने मेघा, आस्ताद आणि सई मधून घरातील सदस्यांच्या मताने कोणत्याही एका सदस्याची कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी निवड करायला सांगितलं. मेघा आणि शर्मिष्ठाने अस्तादला मतं दिली. याच कारणामुळे सई आणि मेघा यांच्यात फूट पडली. ग्रुपमध्ये पडलेली फूट पाहता पुष्करनं सईला समजावण्याचा प्रयत्न केला. सईच्या अशा वागण्यानं मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा दुखावल्या गेल्या आहेत. सईनं त्यांच्याशी एकदा बोलायला हवं असं पुष्करनं तिला सुचवलं. परंतु, सईला हे पटलं नाही. ती तिच्या न बोलण्याच्या निर्णयावर ठाम आहे.