आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay76: सई, मेघा, स्मिता, शर्मिष्ठा, नंदकिशोर झाले नॉमिनेट, घरात आल्या सुकन्या-अतिशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस यांनी काल आगळावेगळा टास्क दिला. बिग बॉस यांच्या असे निदर्शनास आले की, गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्वाचा नियम आज बिग बॉस शिथिल करण्यात आला. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी दिली. पण यामध्ये बिग बॉस यांनी एक अट घरातील सदस्यांना दिली. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तासच होता. काल बिग बॉस मराठीच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सई, मेघा आणि स्मिता तर बिग बॉस यांनी दिलेले सिक्रेट कार्य शर्मिष्ठा आणि नंदकिशोर यांनी पार न पाडल्यामुळे ते दोघे देखील नॉमिनेट झाले. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडणार हे बघणे रंजक असणार आहे.  

 

'घाडगे & सून' मालिकेतील माई आणि वसुधाचे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्वागत... 
बिग बॉस घरातील सदस्यांना नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. तसेच एक सरप्राईझ आज घरातील सदस्यांना मिळणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून मधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक जाणार आहेत. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होणार आहे. शर्मिष्ठा सुकन्या ताईना बघून बरीच भावूक झाल्याचे दिसून येणार आहे. या दोघी आतमध्ये गेल्यानंतर बरीच धम्माल मस्ती होणार हे तर नक्कीच.

 

आज रंगणार हा टास्क... 

बिग बॉस सदस्यांना एक टास्क देणार आहेत. संसार म्हटलं की, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “घरोघरी मातीच्या चुली” या कार्यानिमित्त नात्यातील अशीच एक गंमत बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये मेघा पुष्करला बरीच अतरंगी कामे देणार आहे जसे स्विमिंग पूलच्या पाण्याने बादली भरणे ज्यासाठी मेघा पुष्करला एक छोटेसे झाकण देणार आहे. तर सईला शर्मिष्ठा आणि नंदकिशोर आस्तादला काही वेगळीच कामे देणार आहेत. आता ही काम घरातील सदस्य कशी पूर्ण करतील हे बघणे रंजक असणार आहे.

 

बघा, आजच्या भागाची क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...