आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMDay79&80: सुकन्या-अतिशाच्या एन्ट्रीनंतर आज भाग्यश्री येणार घरात, मेघा-पुष्करमध्ये रंगणार वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना बिग बॉस नेहेमीच एका पेक्षा एक जबरदस्त सरप्राईझ देत असतात. तसेच एक सरप्राईझ काल सदस्यांना मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून मधील सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने आणि वसुधा म्हणजेच अतिशा नाईक गेल्या. सुकन्या आणि अतिशा यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. बिग बॉस यांनी सदस्यांना काल एक टास्क दिला. संसार म्हटल की, भांड्याला भांड हे लागणारच. अगदी याप्रमाणेच सासू – सुनांच्या नात्यामध्येही खटके उडणे स्वाभाविक आहे.

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “घरोघरी मातीच्या चुली” हे कार्य रंगले. ज्यामध्ये पुष्कर, सई, मेघा, आस्ताद, नंदकिशोर आणि शर्मिष्ठा यांना हिरे देण्यात आले. कारण, त्यांनी हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले. आज देखील घरामध्ये हे कार्य रंगणार आहे. परंतु बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज वसुधाबरोबर असणार आहे घाडगे & सून मालिकेतील सगळ्यांची लाडकी अमृता.  

 

आज देखील सासू सासऱ्यांना त्यांच्या जावई सुनांना सतवायचे आहे. मात्र आज टीम्समध्ये अदलाबदल करण्यात येणार आहे. टीम सून - जावयाचे नेतृत्व भाग्यश्री तर टीम सासू – सासऱ्यांचं नेतृत्व अतिशा नाईक करणार आहेत. ज्यामध्ये शर्मिष्ठा आणि सई मध्ये तर मेघा आणि पुष्कर मध्ये बरेच वाद होणार आहेत. रेशम स्मिताला हिरवी गोळी बनवायला सांगणार आहे. ज्यासाठी स्मिताला पाटा वरवंटा याचा वापर करायचा आहे.

 

आज काय काय घडेल ? कोणामध्ये वाद होतील ? कोणाला जास्त हिरे मिळतील ? हे आजच्या भागात बघणे रंजक असेल. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, आजच्या भागाची निवडक छायाचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...