आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBDay93: आज मेघाच्या वर्गात विद्यार्थी घालतील गोंधळ, या भूमिकेत असतील शर्मिष्ठा-पुष्कर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील रंगणार “मस्ती की पाठशाला” हे कार्य. ज्यामध्ये काल सई आणि आस्ताद शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. आज देखील हा टास्क घरामध्ये खेळला जाणार आहे. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काहीना काही शिकले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी शाळे सारख्या अनेक गोष्टी शिकल्या. शाळा म्हटलं की, वर्गामध्ये दबदबा असलेला monitor, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, शेवटच्या बेंचवर बसणारी दंगा घालणारी मुलं, असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात. या टास्कमध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक बनले आहेत. काल सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली आणि आज देखील करणार आहेत हे नक्की. सई आणि आस्ताद काल शिक्षक बनले होते.  

 

आज टास्कमध्ये मेघा आणि शर्मिष्ठा शिक्षिका आणि पुष्कर शिक्षक बनणार आहेत. या एका वेगळ्याप्रकारच्या टास्कमुळे सदस्यांना देखील मज्जा येत आहे. हा टास्क करत असताना सगळ्याच सदस्यांना शाळेची आठवण येत असणार हे निश्चित. आज मेघा शिक्षिका असताना विद्यार्थी बनलेले सदस्य मेघाला बरीच दमछाक करायला लावणार आहेत. शिक्षिका बनलेल्या मेघाला थोडासा त्रास देण्यासाठी सगळे विद्यार्थी बाथरूम मध्ये गेले असता मेघा त्यांना तिथेच बंद करणार आहे. मेघा शिक्षिका असताना मुलांनी तिच्या वर्गात बराच दंगा केला आणि तो आज प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तो बघताना त्यांना बरीच मज्जा देखील येणार आहे. तसेच शर्मिष्ठाच्या वर्गामध्ये सगळे त्यांना आवडणारे चित्र काढणार आहेत. तसेच आज पुष्कर देखील शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


बघा, आजच्या भागाची क्षणचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...