आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBDay96: आज मेघाला होणार अश्रू अनावर, पुष्कर-सईला बिग बॉसकडून मिळणार हे खास सरप्राइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सकाळपासून सदस्यांमध्ये अंतिम फेरीबद्दलची चर्चा रंगणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी सगळे खूप भाऊक झालेले दिसणार आहेत. कारण बिग बॉस यांनी लावलेले गाणे. सगळ्यांना घरामधील आजवरचे टास्क, भांडण, गप्पा सगळे आठवणार आहे. मेघाचं पहिल्या दिवसापासूनच किचनवरच प्रेम आणि तिला अनावर झालेले अश्रू. हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळं या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता Grand Finale मध्ये पोहचले आहेत. 

 

बिग बॉस सदस्यांना दाखवणार त्यांचा घरातील प्रवास... 
आज बिग बॉस सगळ्या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवणार आहेत. पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे, हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली. पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला, तसेच या घरामधील पुष्करच्या प्रवासातील काही महत्वाच्या गोष्टी देखील त्याच्या AV मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

 

सईला देखील बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. घरातील मैत्री, अडचणी, मेघा – तिचे नाते, सदस्यांनी तिच्यावर केलेले आरोप. हे सगळ बघून दोघे भाऊक होणार यात शंका नाही. बिग बॉस यांनी दिलेल्या या खास सरप्राईझमुळे घरातील सदस्य खूप खुश असून त्यांना आता बिग बॉस जिंकल्यासारखेच वाटत आहे असे ते बिग बॉस यांना सांगणार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, आजच्या भागाची खास झलक छायाचित्रांमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...