आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBmarathi : घसरत्या टीआरपीमुळे झाली हर्षदा खानविलकरची शोमध्ये एन्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हर्षदा खानविलकरने आक्कासाहेब बनून टेलिव्हिजन विश्वात अधिराज्य गाजवल्यावर आता त्यांची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्यांची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसच्या घरात झाली आहे. मराठी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात  आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आपल्या रोखठोक सवाल-जवाबाने पुन्हा एकदा हर्षदा यांनी रसिकांची मनं जिंकली.

 

शोमध्ये येण्यापूर्वी झाली इन्स्टाग्रामवर एन्ट्री... 
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्याअगोदर सकाळी हर्षदा खानविलकर यांचा इन्स्टाग्रामवर डेब्यु झाला होता. इन्स्टाग्रामवर येताच 24 तासांच्या आत हर्षदा यांच्या फॉलोवर्सची संख्या तीन हजारांच्यावर गेली.  सूत्रांच्या माहितीनुसार, हर्षदा खानविलकर या पहिल्या मराठी अभिनेत्री आहे, ज्यांचे 24 तासांत एवढे जास्त फॉलोवर्स झाले. हर्षदा यांची जनमानसात असलेली ही प्रसिध्दी माहित असल्यामुळेच त्यांची निर्मात्यांनी बिग बॉसमध्ये एन्ट्री करायचे ठरवले. 

 

...म्हणून झाली शोमध्ये एन्ट्री?

सूत्रांच्या मते, बिग बॉसच्या घरात काही दिवसांपासून चालू असलेल्या त्याच-त्याच वादाचा परिणाम बिग बॉसच्या घसरत्या टीआरपीवरही होत होता. त्यामुळेच आक्कासाहेब बनून सहा वर्ष मालिकेचा टीआरपी चढता ठेवण्याएवढी लोकप्रियता असणा-या हर्षदा खानविलकर यांची एन्ट्री बिग बॉसमध्ये झाली. आता प्रेक्षकांच्या लाडक्या अक्कासाहेब घरात काय धमाल करणार हे बघण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, हर्षदा खानविलकर यांच्या शोमधील एन्ट्रीनंतर चाहत्यांच्या सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आणि हर्षदा यांची शोमधील एन्ट्रीची छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...