आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss मराठीच्या घरात स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकरांना वाटली ‘हुकूमशहा’ची लाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना हुकूमशहा हा टास्क दिला. या टास्कमध्ये नंदकिशोर चौघुले हुकूमशहा तर घरातील इतर सदस्य प्रजा आणि आस्ताद रक्षकाच्या भूमिकेत दिसला. पण या टास्कदरम्यान ‘हुकूमशहा’ झालेल्या नंदकिशोर चौघुलेच्या एकुणच वागणुकीवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर चांगलेच वैतागले आहेत. तर प्रेक्षकांनीही नंदकिशोरवर आपला संताप व्यक्त केला आहे. 'द ग्रेट डिक्टेटर' या टास्क अंतर्गत घरातील इतर सदस्यांना नंदकिशोरच्या आदेशानुसार वागावं लागणार, असा हा टास्क आहे. 


शर्मिष्ठाला मसाज तर सईला सांगितले डान्स करायला... 
या टास्कअंतर्गत नंदकिशोरने शर्मिष्ठाला मसाज आणि सई लोकूरला डान्स करण्यास सांगितले. शर्मिष्ठाने तिच्या मनाविरुद्ध जाऊन स्वतःची समजूत घालत हुकुमशहा झालेल्या नंदकिशोरचे हात पाय दाबले, तर सई माझी व्यक्तिगत नृत्यांगणा असून ती मला हवं तेव्हा नृत्य सादर करेल, असे हुकुमशहा नंदकिशोरने त्याच्या प्रजेला सांगितले. त्याच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. महेश मांजरेकर यांनी देखील ‘आज मला लाज वाटतेय’, असं ट्विट करत ट्विटरवरुन या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

नंदकिशोरने महिलांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत... 
एका यूजरने लिहिले, किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवला ह्या नंदकिशोरने हा टास्क... असे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने नंदकिशोरला आवरा... अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टास्कच्या नावावर नंदकिशोर मेघाच्या टीमला ह्युमिलेट करतोय, असेही यूजर्सनी म्हटले आहे. 


नंदकिशोर महिलांचा आदर करत नसल्याची प्रतिक्रिया यापूर्वी व्यक्त झाली आहे. आता या आठवड्यात विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकर नंदकिशोरची त्याच्या एकुणच वागणुकीवर त्याची चांगलीच खरडपट्टी काढणार हे नक्की.  

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, महेश मांजरेकर आणि यूजर्सचे ट्वीट आणि चौथ्या स्लाईडपासून कालच्या भागाची छायाचित्रे...
 

बातम्या आणखी आहेत...