आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Jui Gadkari Goes Emotional जुईला अश्रू झाले अनावर, बिग बॉसला म्हणाली \'मला येथून बाहेर काढा\'

#BBMarathi: जुईला अश्रू झाले अनावर, बिग बॉसला म्हणाली - \'मला येथून बाहेर काढा\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जुई गडकरी सध्या खूपच दुखावली गेली आहे. अलीकडेच तिने बिग बॉसकडे या घरात राहण्याची इच्छा नसून मला येथून बाहेर काढा, अशी विनंती केली आहे. नेमके घरात जुईबरोबर घडले तरी काय, ती का या खेळातून बाहेर पडू इच्छिते, नक्कीच हे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

 

त्याचे झालेअसे की, घरातील काही सदस्य अर्थातच मेघा धाडे, सई लोकूर हे जुईला ती सतत घरात खोटी वागत असल्याची दुषणं देत असतात. त्यामुळे जुई खूप दुखावली गेली आहे. इतकेच नाही तर टास्कदरम्यान जुई सतत कारणं देत असते, तब्येतीची कारणं पुढे करुन टास्कला न्याय देत नाही, असेही घरातील काही सदस्यांचे मत आहे. यावरुन दर आठवड्यात महेश मांजरेकरांकडून तिला ओरडा मिळतो. या कारणांमुळे मानसिक त्रास होत असल्याचे जुईने भूषण आणि सुशांतला बोलून दाखवले.   

 

सुशांत-भूषणने काढली जुईची समजूत.. 
कालच्या भागात  जुई भूषण आणि सुशांत यांच्याजवळ मनातील दुःख व्यक्त करताना दिसली. लोकांना आपणच का व्हिलन वाटतो, असा प्रश्न तिने भूषण आणि सुशांतला विचारला. त्यावर दोघांनीही तिची समजूत घातली. तुला घरी जायचं तर जा, पण हरुन नाही तर लढून जा, जी लोक आपल्याला व्हिलन ठरवतं, आहे, त्या लोकांना एक्सपोज करुन घरी जा, असे सुशांत जुईला म्हणाला. 


जुई म्हणाली, महेश मांजरेकरांसमोर माझी प्रतीमा मलीन झाली... 
महेश मांजरेकरांविषयी आपल्या मनात अतिशय आदर असून त्यांच्या नजरेत माझी प्रतिमा मलीन झाली आहे, अशी खंत जुईने यावेळी बोलून दाखवली. त्यावर असं काहीही झाले असून महेश मांजरेकरांच्या मनात तुझी इमेज चांगलीच आहे, असे सुशांत आणि भूषण यांनी जुईला सांगितले.  


एकुणच मेघा आणि सई यांच्यामुळे जुई प्रचंड दुखावली असून ती आता घरात स्वतःला कशी सावरणार, तिला भूषण, सुशांत, रेशम यांची साथ कशी मिळणार, हे येणा-या भागांत बघायला हवं.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, इमोशनल झालेल्या जुईची छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...