आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi: आज बिग बॉसच्या घरात येणार कोणते गेस्ट? बिग बॉस देणार कोणता टास्क?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले बिग बॉस यांचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “टिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे टिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. काल मेघा “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद झाली. आज टास्कमध्ये काय होणार ? “टिकीट टू फिनाले” या रेसमधून कोण बाद होणार ? कोणाला “टिकीट टू फिनाले” मिळणार ? तसेच आज कोणते अतिथी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. 

 

बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर घरातील सदस्य मेघाच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनीच तिला जाब विचारायला सुरुवात केली. रेशमने मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न केला कि, ती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सईने शर्मिष्ठाला आणि आस्तादने मेघाला जाब विचारला. पुष्कर आणि सई मेघावर काल बरेच नाराज झालेले दिसून आले. मेघा जे काही पुष्कर बद्दल बोलली त्यावरून पुष्कर आणि सईने देखील मेघाचे नाव “टिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद होण्यासाठी घेतले. 


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज – गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर आज बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे ? हे बघणे रंजक असणार आहे. ज्यामध्ये मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून बॉक्स मध्ये असलेले शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सई यांना त्या बॉक्स मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तसेच काल झालेल्या चर्चेवरून आणि वादावरून शर्मिष्ठा आणि मेघा मध्ये आज बरीच चर्चा होणार आहे. नेमकं काय होणार हे आपल्याला आज पाहायला मिळेल. 
 

 

बातम्या आणखी आहेत...