आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi :रेशमवरचे जाहिर प्रेमाचे प्रदर्शन प्रेक्षकांना खटकले, राजेशची EXIT, रेशम कोलमडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण खूप भावुक झाले. रेशमला तर अश्रू अनावर झालेले दिसले. विशेष म्हणजे टास्कमुळे नव्हे तर टीव्हीवर केलेले जाहिर प्रेमाचे प्रदर्शन प्रेक्षकांना खटकले, त्यामुळे तू शोमधून बाहेर पडतोय, असे महेश मांजरेकरांनी राजेशकडे स्पष्ट केले. 

 

नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी राजेशला देखील मिळाली तेव्हा राजेशने घरातील काही सदस्यांना तर काही सदस्यांनी त्याच्या जवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या.  

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना दिला फुलांचा आणि काट्यांचा मान. स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले. उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला. सईने राजेशला काटे तर मेघाला गुलाबाचा मान दिला. 

 

एकदा अज्ञात वासामध्ये राहिल्यानंतर राजेश शृंगारपुरे या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, राजेश श्रृंगारपुच्या एक्झिटचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...