आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi : खरंच 'रेशमगाठ' सुटणार का? राजेशच्या पत्नीने सोडले मौन, म्हणाली....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉस मराठीच्या घरात रेशम टिपनीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्यात जवळीक निर्माण झाल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. राजेशने रेशमवर असलेल्या प्रेमाचे जाहिर प्रदर्शन केले आणि त्याचा  परिणाम म्हणजे त्याला या खेळातून आऊट व्हावे लागले.  राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सर्वाधिक रेशम टिपनीसला झाले. घराबाहेर पडल्यानंतर राजेश रेशमसोबतच्या नात्याविषयी मीडियाशी बोलला. ‘रेशमसोबतचे माझे आयुष्य हे कायचम असून, ती माझी खूपच चांगली मैत्रीण असणार आहे. बिग बॉसच्या निमित्ताने मला एक जिवाभावाची मैत्रीण भेटली. तिला माझी साथ कायम राहील", असे राजेश म्हणाला. 

 

विशेष म्हणजे आता राजेशची पत्नी डिंपल श्रृंगारपुरे हिनेही या प्रकरणावरचे आपले मौन सोडले आहे. जेव्हा राजेश बिग बॉसच्या घरात होता, तेव्हा डिंपलने याप्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. पण राजेश घराबाहेर पडल्यानंतर डिंपल राजेशचे घर सोडून गेल्याची चर्चा रंगू लागली. डिंपल राजेशचे घर सोडून तिच्या थोरल्या बहिणीकडे राहायला गेल्याची चर्चा होती.  पण डिंपलने नव-याचे घर सोडले नसल्याचे एका मीडिया हाऊसला सांगितले आहे. 


काय म्हणाली डिंपल... 
एका प्रसिद्ध मीडिया हाऊसशी बोलताना डिंपल श्रृंगारपुरे म्हणाली,  'मला सख्खी बहीण नाही. त्यामुळे मी घर सोडून बहिणीकडे राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी माझ्या आणि राजेशच्या घरीच राहत असून आमचा संसार अगदी उत्तम सुरू आहे. मी माझ्या दोन मुलींसोबत आणि राजेशसोबत फार आनंदी आहे,' असेही तिने स्पष्ट केले. 


राजेशसोबत पुर्वीसारखेच नाते...
राजेश बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर डिंपलने त्याचा स्वीकार केला नसल्याचेही म्हटले गेले होते. पण या सगळ्या अफवा असल्याचे स्वतः डिंपलने स्पष्ट केले आहे. 


रेशमसोबतच्या नको तितक्या जवळीकीमुळे घराबाहेर पडला राजेश...
राजेश आणि रेशम यांच्यातील नको तेवढी वाढलेली जवळीक प्रेक्षकांना रुचली नाही. सोशल मीडियावर या दोघांवर टीकेची झोडच उठलेली दिसली. टास्क किंवा खेळामुळे नव्हे तर रेशमसोबतच्या नको तेवढ्या जवळीकीमुळे तू या स्पर्धेतून बाद झाला, असे महेश मांजरेकरांनी राजेशला सांगितले होते.


दोन मुलींचा वडील आहे राजेश...
राजेश आणि डिंपल श्रृंगारपुरे यांच्या लग्नाला 11 ते12 वर्षांचा काळ लोटला आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मुलींवर खूप प्रेम असल्याचे, राजेश अनेकदा शोमध्ये बोलताना दिसला. तसंच पत्नी डिंपल अतिशय समजूतदार असल्याचेही त्याने शोमध्ये म्हटले होते.


ुुपुढील स्लाईड्सवर बघा, बिग बॉसच्या घरात राजेशने रेशमसोबत घालवलेले क्षण.... 

बातम्या आणखी आहेत...