आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Rutuja Dharmadhikari Quit The Show #BBMarathiDay36 : ...म्हणून ऋतुजा धर्माधिकारीने अर्ध्यावर सोडला डाव

#BBMarathiDay36 : ...म्हणून ऋतुजा धर्माधिकारीने अर्ध्यावर सोडला डाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बॉस मराठी या शोची स्पर्धक ऋतुजा धर्माधिकारीने अर्ध्यावर हा शो सोडला आहे. ऋतुजाने शो सोडण्याचा तिचा निर्णय बिग बॉसकडे बोलून दाखवला. 'रंग माझा वेगळा' या टास्कदरम्यान तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर उपचारदेखील झाले. मात्र बिग बॉसच्या मेडिकल टीमकडून जेव्हा ऋतुजाचा एमआरआय करण्यात आला, तेव्हा तिच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. हे सांगण्यासाठी बिग बॉसने ऋतुजाला कन्फेक्शन रुममध्ये बोलावून घेतले. यावेळी तिने तिला असहनीय वेदना होत असल्याचे बिग बॉसला सांगितले. 


ऋतुजा म्हणाली, या अवस्थेत घरात राहणे शक्य नाही... 

बिग बॉसने ऋतुजाला या अवस्थेत घरात राहणार की शोमधून बाहेर पडणार, असे विचारले. त्यावर ऋतुजा म्हणाली,  'हात फ्रॅक्चर झाल्यामुळे होणाऱ्या वेदना सहन होत नसून या वेदनांसह बिग बॉसच्या घरात राहणं अशक्य आहे. मी सर्वच टास्कमध्ये चांगल्या प्रकारे खेळत होते, मात्र यापुढे मला ते जमणार नाही, लहान-लहान गोष्टींसाठी मला इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे यापुढे या घरात राहणे शक्य होणार नाही.' ऋतुजाच्या या निर्णयाला बिग बॉसने संमती दर्शवली आणि तिला घराबाहेर येण्यास सांगितले.  


प्रकृती अस्वस्थामुळे ऋतुजाला हा शो अर्ध्यावर सोडावा लागला आहे. मुळची औरंगाबादची असलेली ऋतुजा 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून घराघरांत पोहोचली आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी आणि पुन्हा या शोमध्ये परतावी, अशीच आशा आपण व्यक्त करुयात.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, ऋतुजाची बिग बॉस मराठीच्या घरातील निवडक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...