आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Tyagraj Khadilkar Exit From Bigg Boss Marathi House #BBMarathi: त्यागराज खाडिलकरचा प्रवास संपला, असा रंगला विकेंडचा डाव

#BBMarathi: त्यागराज खाडिलकरचा प्रवास संपला, असा रंगला विकेंडचा डाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे आलेल्या त्यागराज खाडिलकर यांना घराबाहेर जावे लागले आहे. या आठवड्यामध्ये भूषण, रेशम आणि त्यागराज हे डेंजर झोनमध्ये आले आणि त्यागराज खाडिलकर यांना घराबाहेर जावं लागलं.  बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी त्यागराज यांना देखील मिळाली. 

 

असा रंगला विकेंडचा डाव... 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना वळू, खलनायक, हंटरवाली, चालबाज, बोलबच्चन अशी नावे असलेला मुकुट बहुमताने बहाल करायचा होता. ज्यामध्ये नंदकिशोर यांना खलनायक, बोल बच्चन भूषण, मेघाला चालबाज तर रेशमला हंटरवाली असे मुकुट देण्यात आले. तसेच प्रेक्षकांनी आपल्या मनातील प्रश्न सदस्यांना विचारले.

 

या आठवड्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये नव्हे तर एका वेगळ्या पद्धतीने महेश मांजरेकर यांनी नॉमिनेटेड सदस्यांना खुर्चीत बसवून प्रश्न विचारले. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी नॉमिनेटेड सदस्यांशी निगडीत प्रश्न इतर सदस्यांना विचारले, जर उत्तर बहुमताने हो आलं तर प्रश्नाला खुर्चीत बसलेल्या सदस्याला एक थोबाडीत बसणार होती. मेघा, रेशम, त्यागराज, भूषण, आस्ताद आणि उषा नाडकर्णी हे त्या खुर्चीत बसले होते.

 

त्यागराज खाडिलकर या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडले. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.


पाहुयात, रविवारच्या भागात रंगलेल्या विकेंडचा डावची क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...