आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या. टास्क दरम्यान सदस्यांना दुखापत होणे, सदस्यांमध्ये भांडण होणे, घरामध्ये एकाच ग्रुपची होणारी दादागिरी, त्याच ग्रुपमधील दोन व्यक्तींकडून टास्क दरम्यान होणारी हिंसा आणि शक्तीप्रदर्शन... आणि बिग बॉसने त्या दोन व्यक्तींना म्हणजेच सुशांत आणि राजेश दिलेली शिक्षा.... आणि हे सगळ रोज घडत असताना ते बघणारा प्रेक्षकवर्ग आणि त्यांच्या मनात येणारे असंख्य प्रश्न काल महेश मांजरेकर यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. कालच्या WEEKEND चा डाव मध्ये आस्ताद, ऋतुजा, पुष्कर, सई आणि मेघाचे महेश मांजरेकर यांनी कौतुक केले आणि ऋतुजा माझी आवडती स्पर्धक आहे असे देखील म्हंटले. आज रविवार म्हणजे कोणा एका सदस्याला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागणार हे निश्चित... त्यामुळे आज कोण घराबाहेर जाणार ? कोण होणार नॉमिनेट किंवा कोण होणार सेफ ? हे बघणे रंजक असणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाला मिळणार गुलाबाचा मान ? तर कोणाला मिळणार काट्यांचा मान ? यामध्ये स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले त्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच ... उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला.
तसेच या WEEKEND चा डाव मध्ये प्रेक्षकांशी बोलण्याची संधी घरातील सदस्यांना मिळाली. ज्यामध्ये रेशम आणि सईला प्रेक्षकांनी प्रश्न विचारले. रेशमला एक प्रश्न विचारला कि, तुमची कॉम्पीटीशन या खेळामध्ये कोण आहे ? ज्यावर रेशमने म्हंटले माझी या खेळामध्ये कोणच कॉम्पीटीशन नाही, आणि हा खेळ मी जिंकणार आणि तो कॉन्फिडन्स मी घरूनच घेऊन आले आहे. सईला देखील चाहत्याने खूप मजेदार प्रश्न विचारला कि, तुम्ही तुमची कामे पुष्करला का सांगता ? ज्यावर सईने खूपच गोड उत्तर दिले ती म्हणाली मी माझं काम आता करेन ...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.