आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bigg Boss Marathi Weekendcha Daav And Day 70 Highlights #BBMDay70: सईमुळे दुखावली गेली रेशम, मेघाला अंतवस्त्र धुवायला दिल्याचा लावला आरोप

#BBMDay70: सईमुळे दुखावली गेली रेशम, मेघाला अंतर्वस्त्र धुवायला दिल्याचा लावला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या कालच्या WEEKEND चा डाव या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना सांगितले की, आज एलिमनेशन होणार नाही, सगळे सुरक्षित आहेत. त्यामुळे घरच्यांना खूप आनंद झाला.

 

सईमुळे दुखावली गेली रेशम... 

कालच्या भागामध्ये रेशम सई आणि मेघावर बरीच नाराज असल्याचे दिसून आले. सईने रेशमवर तिने मेघाला तिचे अंतर्वस्त्र धुवायला दिल्याचा आरोप लावला होता. ही गोष्ट सईने रेशमकडे बोलून दाखवण्याऐवजी विकेंडचा डावमध्ये थेट महेश मांजरेकरांना सांगितली. माझ्याकडून असे काहीही घडले नसल्याचे रेशमने स्पष्टीकरण दिले. सईच्या वागण्यामुळे रेशम दुखावली गेली. जर तुला असं काही वाटलं तर माझ्याकडे येऊन बोलायला हवे होते, असे रेशम म्हणाली. 

 

 

मेघा-आऊंनी सईला दाखवली तिची चुक... 

सईकडून झालेल्या चुकीवरून मेघा, शर्मिष्ठा आणि आऊ यांनी तिला बोलून देखील दाखवले की, ज्याप्रकारे रेशमला ती बोलली ते अयोग्य होते आणि यापुढे असे बोलू नकोस. आज सई रेशमची एका वेगळ्याप्रकारे माफी मागणार आहे. तेव्हा रेशम सईला माफ करणार का ? हे आजच्या भागात बघायला मिळणार आहे. 

 

आज रंगणार नवीन टास्क... 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य. बिग बॉस या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना देणार आहेत. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडणार आहे. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात येणार आहेत. प्रत्येक जोडीला एक container देण्यात येणार आहे, त्या container मध्ये वाळू भरलेली असणार आहे. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना ईतर जोड्यांच्या container मधील वाळू कमी करायची आहे तसेच आपल्या container मधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आजच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये कोणत्या जोड्या नॉमिनेट होणार आणि कोणत्या विजयी हे बघणे रंजक असणार आहे.  

 

पाहुयात, आजच्या भागाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये...

बातम्या आणखी आहेत...