आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi: यानिमित्ताने भावूक झाले सदस्य, भूषण पडला घराबाहेर, असा रंगला विकेंडचा डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये भूषण कडूला घराबाहेर जावे लागले आहे. या आठवड्यामध्ये भूषण आणि शर्मिष्ठा हे डेंजर झोनमध्ये आले आणि भूषण कडूला घराबाहेर जावं लागलं.  बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी भूषणला देखील मिळाली. 


बिग बॉस मराठीचा हा आठवडा सरप्राईझ यांनी भरलेला होता. सदस्यांना एकामागोमाग एक सरप्राईझ मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांना एक नव्हे तर दोन सरप्राईझ मिळाले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राजेश शृंगारपूरे, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी यांना पाठविण्यात आले. यांनी प्रत्येक सदस्यांना आपल्या मनामध्ये काय आहे ? सदस्य कसे खेळत आहेत ? आणि त्यांनी कसे खेळले पाहिजे याचे सल्ले दिले. तसेच फादर्स डे निमित्त प्रत्येक सदस्याला त्यांच्या वडिलांशी बोलण्याची संधी दिली. प्रत्येक सदस्याने आपल्या मनातील भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या. सगळेच खूप भाऊक झाले. प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेल्या भावना यानिमित्ताने बाहेर आल्या.


भूषण कडू या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.  

 

बघुयात, बिग बॉस मराठीच्या विकेंडचा डावची खास क्षणचित्रे...

 

बातम्या आणखी आहेत...