आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#BBMarathi: शोसाठी स्पर्धकांनी कपड्यांवर केला एवढा खर्च, विकेंडचा डावमध्ये रंगले नाटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस मराठी हा शो सुरु होऊन आता 50 दिवसांहून अधिकचा कालावधी झाला आहे. 100 दिवस बिग बॉसच्या घरात मराठी सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून राहात आहेत. 15 स्पर्धकांसोबत सुरु झालेल्या या शोमधून काही स्पर्धक घराबाहेर पडले तर काही सेलिब्रिटींची वाइल्ड कार्डच्या माध्यमातून शोमध्ये एन्ट्री झाली. या घरात आलेले स्पर्धक शोच्या ग्रॅण्ड फिनालेपर्यंतची तयारी करुन आले आहेत. उदाहरणार्थ मेघा धाडेने शोच्या ग्रॅण्ड फिनालेसाठी कपड्यांची निवड करुन ठेवली आहे. दर आठवड्याला रंगणा-या विकेण्डच्या डावमध्ये मेघा डिझायनर ड्रेसमध्ये दिसत असते. वीकेण्डचा डावमध्ये एकदा घातलेले कपडे ती पुन्हा घालताना दिसत नाहीत. बिग बॉस मराठीच्या अनदेखा फुटेजमध्ये अलीकडेच उषा नाडकर्णी, आस्ताद काळे आणि भूषण कडू मेघाच्या वॉर्डरोबवर चर्चा करताना दिसते. मेघाने कपड्यांवर भरपूर खर्च केल्याचे या तिघांचे म्हणणे होते. तर शोसाठी फक्त 20 हजार रुपयांची शॉपिंग केल्याचे आस्तादने यावेळी उषा नाडकर्णींना सांगितले. कपड्यांवर आगाऊ खर्च करायला आवडत असल्याचे, यावेळी उषा नाडकर्णींनी सांगितले. शोमध्ये येण्यापूर्वी फक्त तीन टॉप आणि दोन प्लाजो खरेदी केल्याचे त्यांनी आस्ताद आणि भूषणला सांगितले. 


घरात रंगले नाटक... 
बिग बॉसच्या मराठीच्या या आठवड्याच्या विकेंडच्या डावमध्ये घरातील सदस्यांना महेश मांजरेकरांनी त्यांना दिलेला टास्क पूर्ण केला. गेल्या आठवड्यात मांजरेकरांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांची नक्कल करायला लावली. अर्थात, यासाठी नेमून दिलेल्या सदस्याच्या हावभाव, चाल, बोलण्याची पद्धत या प्रत्येक गोष्टीचा होमवर्क त्यांना आठवडाभर करायचा होता. त्यांनी घरातील सदस्यांचे दोन गट केले होते आणि या गटांतील कलाकारांना आपल्या नव्या भूमिकेसह एक छोटे नाटकही सादर करायला सांगितले होते. पुष्कर आणि रेशमचे असे दोन गट त्यांनी केले होते. कायम एकमेकांशी भांडणाऱ्या मेघा आणि रेशमनी एकमेकींची छान नक्कल केली. नंदकिशोर यांनी साकारलेला आस्ताद खऱ्या आस्तादलाही आवडला. पुष्कर व सईने एकमेकांच्या भूमिका केल्या. पुष्करने सईच्या व्यक्तिरेखेचे जबरदस्त बेअरिंग पकडले होते. तर सईनेही पुष्करच्या बारिकसारिक गोष्टींचे नीट निरिक्षण करून त्याची हुबेहुब नक्कल केली. भूषणने साकरलेली आऊ सर्वांनाच भावली. त्याबद्दल महेश मांजरेकरांनी त्याचे कौतुकही केले.  

 

पुष्करचा गट ठरला विजयी.. 

पुष्करचा गट या टास्कमध्ये सरस ठरला. भूषण कडूला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर रेशम व आऊंना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून देण्यात आला. पुष्कर जोग, नंदकिशोर चौघुले व आस्ताद काळे हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले. विशेष म्हणजे या विजेत्या सदस्यांना महेश मांजरेकरांकडून काहीतरी सरप्राईज गिफ्टही लवकरच मिळणार आहे.


पाहुयात, विकेण्डचा डावची क्षणचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...