आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी Bigg Bossचा भारदस्त आवाज ऐकला, आता ते कोण आहेत हेही जाणून घ्या!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 एप्रिलपासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. हा शो सुरु होणार असल्याची चर्चा सुरु झाल्यापासून बिग बॉस मराठीमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, बिग बॉसचे घर कसे असणार, महेश मांजरेकरांचे सूत्रसंचालन याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर 15 एप्रिलला याचा उलगडा झाला आणि शोमध्ये 15 सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाले.  हळूहळू नॉमिनेशमधून हा सेलिब्रिटी स्पर्धक घराबाहेरही पडले, तर एका सेलिब्रिटीची शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीदेखील झाली. हा शो सुरु होऊन आता 37 दिवसांचा कालावधी उलटला आहे. एवढ्या दिवसांत सेलिब्रिटी स्पर्धकांवर लक्ष ठेवणारी, त्यांच्यावर वचक ठेवणारी व्यक्ती कोण  असेल तर ती बिग बॉसचा आवाज. मराठी बिग बॉसचा करारी आवाज लक्ष वेधून घेणार आहे. पण हा भारदस्त आवाज नेमका आहे तरी कुणाचा हे तुम्हाला ठाऊक आहे का? नक्कीच या आवाजामागची व्यक्ती कोण हे जाणून घ्यायला तुम्ही  उत्सुक असाल. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, 'बिग बॉस'मध्ये कधीच दिसत नसलेल्या पण आवाजाने सेलिब्रिटी स्पर्धकांवर वचक ठेवणा-या या बिग बॉसविषयी...

 

प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट रत्नाकर तारदाळकर आहेत बिग बॉस मराठीचा आवाज... 

बिग बॉस मराठीच्या घरात सेलिब्रिटी स्पर्धकांना सूचना देणे असो, त्यांना टास्क समजावून सांगणे असो वा त्यांची कानउघाडणी करणे असो, एकच आवाज बिग बॉसच्या घरात घुमत असतो, तो आवाज म्हणजे बिग बॉसचा आवाज.  या आवाजाला हे स्पर्धकसुद्धा घाबरतात. हा आवाज आहे प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट रत्नाकर तारदाळकरांचा असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


कोण आहेत रत्नाकर तारदाळकर, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...

बातम्या आणखी आहेत...