आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: गुजराती कुटुंबाची सून आहे मराठमोळी श्रेया, अशी आहे विनोदाच्या राणीची LOVE STORY

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सेठ हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची तिशी पूर्ण केली आहे. 2 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात एका मराठी कुटुंबात जन्मलेली श्रेया गुजराती कुटुंबाची सून आहे. श्रेयाचे लग्न निखिल सेठसोबत झाले आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. 


पहिल्याच भेटीत श्रेयाच्या प्रेमात पडला होता निखिल...
श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. एका मुलाखतीत श्रेयाने तिच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते. श्रेयाने सांगितल्यानुसार, शूटिंग सेटवर निखिल तिच्याशी सतत मैत्री करण्याचा प्रयत्न करत असे. काही कारणावरुन दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर निखिलने त्या मालिकेतून काढता पाय घेतला होता. या मालिकेनंतर अनेक महिने दोघांची भेट झाली नव्हती. काही महिन्यांनी निखिल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असेलली गुंतता हृदय ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली. मालिकेच्या क्रेडिटमध्ये निखिलचे नाव बघून श्रेयाने त्याला फोन केला आणि मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या. या फोन कॉलनंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याकाळात निखिलचे घरचे त्याच्या लग्नासाठी मुली शोधत होते. एकेदिवशी निखिलने श्रेया तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रेयाने हो उत्तर दिल्यानंतर निखिलने तिला लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या सहमतीने दोघांचे लग्न झाले. निखिलचे हे लव्ह अॅट फर्स्ट साइट होते. तर श्रेयासाठी हे मुळीच लव्ह अॅट फर्स्ट साइट नव्हते.   


निर्माता आहे निखिल सेठ
श्रेयाप्रमाणेच निखिलचेही एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीसोबत घट्ट नाते आहे. अनेक मराठी मालिकांची निर्मिती निखिलने केली आहे. 


पाहुयात, विनोदाच्या राणीचे नव-यासोबतचे रोमँटिक क्षण खास छायाचित्रांमधून...  

बातम्या आणखी आहेत...