आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: एका व्यक्तीच्या इच्छेसाठी निलेशला व्हावे लागले डॉक्टर,लपून पाहायचा शुटिंग, असा आहे प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटन्मेंट डेस्कःदर सोमवारी आणि मंगळवारी छोट्या पडद्यावर साडे नऊ वाजता ''प्रेक्षक हो हसताय ना... हसायलाच पाहिजे...'' असे म्हणत घराघरांत अवतरणारा होस्ट म्हणजे डॉ. निलेश साबळे. सासवड (पुणे) चा राहणारा एक मुलगा अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी घालतो. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाच्या स्पर्धेत भाग घेतो आणि ती स्पर्धा तो जिंकतोसुद्धा. पुढे फू-बाई-फू मालिकेचा निवेदक म्हणून सर्वांच्या मनात घर करतो. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ म्हणत त्याची गाडी सुसाट सुटते. पण वरवर जरी हे सगळं सहज-सोपं वाटंत असलं, तरी त्यामागचे प्रयत्न, अडथळ्यांवर मात करत स्वप्नपूर्तीसाठी झगडून हा तरुण आज यशोशिखरावर पोहोचला आहे.

 

प्रेक्षकांच्या लाडक्या निलेशचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहे. निलेश साबळे अभिनेता होण्यापूर्वी डॉक्टर आहे. मात्र बालपणापासून अभिनयाची आवड असूनदेखील त्याला डॉक्टर का व्हावे लागले, यामागची काय कहाणी आहे, याची खास माहिती आम्ही त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आलो आहोत.

 

चला तर मग जाणून घेऊया निलेशविषयी...

 

>> निलेश मुळचा पुण्यातील सासवड येथील आहे. 30 जून 1986 रोजी निलेशचा जन्म झाला. त्याने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. 

 

>> निलेश डॉक्टर आहे. मात्र बालपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. निलेश डॉक्टर होण्यामागे एक कहाणी आहे. निलेशच्या वडिलांना डॉक्टर व्हायची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना डॉक्टर होणे शक्य झाली नाही. निलेशचे वडील एमपीएससी करुन अधिकारी बनले. मात्र दोन मुलांपैकी एका मुलाने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून निलेश डॉक्टर बनला. 


>> निलेशच्या आईला अभिनयाची आवड आहे. त्यामुळे आईकडून नेहमीच त्याला अभिनयासाठी पाठिंबा मिळाला. 


>> वडिलांनी निलेशची अभिनयाकडील ओढ बघून एक ते दीड वर्षांत अभिनयात काय करायचे ते कर, मात्र तिकडे जम बसला नाही, तर पुन्हा डॉक्टर म्हणून करिअर करावे, असे म्हटले होते. पण नंतर अभिनयात स्थिरस्थावर होत असताना वडिलांनीही त्याला प्रोत्साहन दिले.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, कसा झाला डॉ. निलेश साबळेचा अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास आणि बरेच काही...  

बातम्या आणखी आहेत...