आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday Spl : यापूर्वी पाहिले नसेल मृण्मयीचे हे रुप, काही वेगळ्या लूक्सचे Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - मराठी इंड्स्ट्रीतील लोभस सौंदर्याच्या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन घेतले जाणारे नाव म्हणजे मृण्मयी देशपांडे. 'कुंकू' या गाजलेल्या मालिकेपासून सुरू झालेला मृण्मयी हिचा या ग्लॅमर इंडस्ट्रीतील प्रवास थक्क करणारा असा आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये अभिनेत्री म्हणून मृण्मयीमध्ये बराच बदल घडत गेला. अॅक्ट्रेस म्हणून हा बदल   जसा तिच्या अभिनयात घडला त्याचप्रमाणे तिच्या लूकमध्येही बदल घडत गेला.


'कुंकू' किंवा त्यानंतर आलेल्या मालिका, चित्रपट आणि शोमध्येही प्रामुख्याने मृण्मयीचा अगदी मराठमोळा असा लूक पाहायला मिळत असतो. मराठमोळ्या लूकमध्ये तर मृण्मयीचा कोणीही हात धरू शकणार नाही, असे तिच्या चाहत्यांचे प्रामाणिक मत आहे. पण पारंपरिक लूकबरोबरच मृण्मयीने काही चित्रपटात किंवा कार्यक्रम फोटोशूटच्या निमित्ताने डिफरंट लूकही ट्राय केला आहे. तो पाहिल्यानंतर हिने याच लूकमध्ये राहावे असे वाटल्याशिवाय राहत नाही. मृण्मयीचे असेच काही लूक आपण आज (29 मे) तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहणार आहोत.


मृण्मयीच्या प्रवासाबाबत जाणून घ्या आणि पाहा तिचे काही डिफरंट Looks, पुढील स्लाइड्सवर..

बातम्या आणखी आहेत...