आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थने घेतला स्वतःचा आशियाना, अँटिक वस्तूंनी सजवले घरकुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरचा आज (14 जून) वाढदिवस असून त्याने वयाची 27 वर्षे पूर्ण केली आहेत. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचे दोन वर्षांपूर्वी स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. सप्टेंबर 2016 मध्ये सिद्धार्थने पुण्यात स्वतःचे घर घेतले. माझे स्वतःचे घर असावे, असे माझ्या आईचे स्वप्न होते. तिचे स्वप्न पुर्ण केल्याचे समाधान असल्याचे सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितले होते. 

 

अँटिक वस्तूंनी सजवले आहे घर...
सिद्धार्थने त्याच्या स्वप्नातील घराला अगदी मराठमोळा टच दिला आहे. स्वतः त्याने घराचे इंटेरिअर केले असून अँटिक वस्तूंनी घर सजवले आहे. घराला कलरफूल पडदे लावले आहेत. सिद्धार्थने त्याच्या फेसबुक अकाउंटवर त्याच्या सुंदर आशियानाचे निवडक फोटोदेखील शेअर केले आहेत. 


'अग्निहोत्र' आहे सिद्धार्थची पहिली मालिका... 
‘अग्निहोत्र’ ही सिध्दार्थची पहिली मालिका आहे. त्यानंतर त्याने अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'झेंडा' चित्रपटात काम केले. बालगंधर्व, सतरंगी रे, जय जय महाराष्ट्र माझा, संशय कल्लोळ, लग्न पाहावे करुन, दुसरी गोष्ट, बावरे प्रेम हे, क्लासमेट्स, ऑनलाईन बिनलाईन, पिंडदान, लॉस्ट अँड फाऊंड, वजनदार, बसस्टॉप, गुलाबजाम या चित्रपटांत सिध्दार्थने झळकला आहे.  अग्निहोत्र मालिकेसह सिध्दार्थने कशाला उद्याची बात आणि मधू इथे आणि चंद्र तिथे या मालिकांमध्येही काम केले आहे. 


आज सिद्धार्थच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बघुयात, त्याच्या पुण्यातील घराचे खास PHOTOS... 

 

बातम्या आणखी आहेत...