आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 वर्षांची झाली मुक्ता, वयाची तिशी-पस्तीशी ओलांडलेल्या या अभिनेत्रींनी आहेत सिंगल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील प्रगल्भ अभिनेत्री म्हणून जिला ओळखले जाते, ती अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.  17 मे 1981 रोजी पुण्यात जन्मलेल्या मुक्ताचा आज वाढदिवस असून तिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. रंगभूमी, छोटा आणि मोठ्या पडद्यावर मुक्ताने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अभिनेत्रीसोबतच निर्माती म्हणूनही ती आता नावारुपाला येतेय. मुक्ताने अवघी चार वर्षाची असताना तिची आई आई विजया बर्वे यांच्या ‘रुसू नका फुगू नका’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर 15 व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या ‘घर तिघांचे हवे’ या नाटकात भूमिका केली. मुक्ताने मराठीसोबतच काही हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. तिने पुण्याच्या ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे. तिचे 'कोडमंत्र' हे नाटक रंगभूमीवर बरेच गाजले. अलीकडेच ती 'हृदयांतर'  आणि 'आम्ही दोघी' या चित्रपटांमध्ये झळकली. तर 'मुंबई पुणे मुंबई 3' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे.


वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरही सिंगल आहे मुक्ता... 
वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतरही मुक्ता तिच्या करिअरमध्ये सक्सेसफुल आणि सिंगल आहे. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com वाचकांना मराठी इंडस्ट्रीतील वयाची तिशी आणि पस्तीशी ओलांडणा-या अविवाहित अभिनेत्रींविषयी सांगत आहे.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, या अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...